nagpur sakal
नागपूर

नागपूर : गरिबीवर मात करीत स्वप्नांचा जिद्दीने पाठलाग!

सरावासाठी धावपटू रिया दोहतरे गाठते सायकलने रेशीमबाग मैदान

नरेंद्र चोरे

नागपूर : खेळाडू जिद्दी व मेहनती असेल तर त्याच्या मार्गात गरिबी अडथळा ठरू शकत नाही. राष्ट्रीय दर्जाची युवा महिला धावपटू रिया दोहतरेने ते सिद्ध करून दाखविले. रियाने गेल्या दोन वर्षांत अनेक स्पर्धा गाजवून आपली गुणवत्ता सिद्ध केली. स्वप्नांचा जिद्दीने पाठलाग करणाऱ्या रियाची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असून, त्या दिशेने सध्या तिची झपाट्याने वाटचाल सुरू आहे.

अॅथलेटिक्समध्ये बहुतांश खेळाडू गरीब व मध्यमवर्गीय घरातील आहेत. रियाही याला अपवाद ठरली नाही. रियाला लहानपणापासूनच रनिंगची आवड होती. त्यामुळे याच खेळात करिअर करण्याचा निर्णय घेत ती पहिल्यांदा मैदानावर उतरली. तीन वर्षांपूर्वी रनिंगला सुरुवात केल्यानंतर अल्पावधीतच तिने आपली छाप सोडली. स्थानिक स्पर्धा गाजविल्यानंतर पुढे राज्य व राष्ट्रीय पातळीवर तिने झेप घेतली.

अनेक स्पर्धा व मेडल्स जिंकले. खरबी (वाठोडा) येथे राहणारी रियाही सध्या गरिबीचा सामना करीत आहे. तिच्या वडिलांचा (राजेश) अपघात झाल्यानंतर कुटुंबाचा सर्व भार आई अनितावर आला. त्यामुळे घर चालविण्यासाठी अनिताला बुटिकमध्ये काम करावे लागत आहे. या कमाईतही संसार चालविताना कसरत होत असल्याने राजेशही घरीच कपडे प्रेसचे काम करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहेत. आर्थिक चणचण असूनही आईवडिलांनी रियाचे क्रीडाप्रेम जपले. शिवाय मोठ्या मुलीलाही उच्च शिक्षण देत आहेत.

गरिबीवर मात करीत स्वप्नांचा जिद्दीने पाठलाग !

अॅथलेटिक्समध्ये स्टॅमिना खूप महत्त्वाचा असतो. त्यासाठी हेल्दी डायट घेणे आवश्यक असते. मात्र, पैशाच्या अडचणीमुळे रिया सकस आहार घेऊ शकत नाही. त्यामुळे अनेकदा कामगिरीही प्रभावित होते. तिची हलाखीची परिस्थिती पाहून ट्रॅकस्टार क्लबचे प्रशिक्षक रवींद्र टोंग, चक्रपाणी महाविद्यालयाचे डॉ. दिलीप तभानेंसह अनेकांनी मदतीचा हात देऊन तिच्या स्वप्नांना पाठबळ दिले आहे. उद्यापासून (ता. १७) पासून वारंगल येथे सुरू होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेची तयारी करीत असलेल्या २० वर्षीय रियाला सीनियर गटात चमकदार प्रदर्शन करून राष्ट्रीय स्तरावर तीन हजार स्टीपलचेसमध्ये आपला ठसा उमटवायचा आहे. शिवाय भविष्यात आशियाई व ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे तिचे स्वप्न आहे.

प्रॅक्टिससाठी सायकलने पायपीट

गरिबीचे चटके सहन करीत असलेल्या रियाला सरावाच्या निमित्ताने दररोज खरबी ते रेशीमबाग मैदान सायकलने सहा ते आठ किमी पायपीट करावी लागते. जाण्यायेण्याने ती थकून जाते. कोरोनाकाळातही तिने खेळावरील फोकस कमी होऊ दिला नाही. कधीकधी प्रॅक्टिस मानकापूर किंवा विद्यापीठ मैदानावर राहात असल्याने मैत्रिणीलाही अनेकवेळा लिफ्ट मागावी लागत असल्याचे रियाने मोठया मनाने कबूल केले.

मी आतापर्यंत केलेल्या कामगिरीवर पूर्णपणे समाधानी नाही. मला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. मी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करावे, अशी माझ्यासह आईवडिलांचीही इच्छा आहे. त्याच उद्देशपूर्तीसाठी सध्या मी कसून मेहनत घेत आहे.

- रिया दोहतरे, राष्ट्रीय महिला धावपटू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kabaddi Player Murder : कब्बडीपटूची भरदिवसा हत्या! पोलिसांकडून आरोपीचं एन्काउंटर अन् एकास अटकही

Farmer Suicide : नापिकी अन् कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यानं विहिरीत उडी मारून संपवलं जीवन

Ravi Kishan Death Threat : ‘’चार दिवसांत बिहारला आलात की …’’ म्हणत, रवी किशन यांना जीवे मारण्याची धमकी!

Pro Kabaddi Final 2025: दबंग दिल्लीने मारली बाजी! पुणेरी पलटनला अटीतटीच्या लढतीत केले पराभूत, २ गुणांनी रोमहर्षक विजय

Shirur Accident : आरामबसची पुढे चाललेल्या मोटारीला धडक; दोन्ही बससह मोटारीतील १६ प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT