nagpur
nagpur sakal
नागपूर

Nagpur : रेल्वेतील मृतांचे डीएनए सुरक्षित !

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - रेल्वे प्रवासात अचानक प्रवाशाचा मृत्यू होण्याच्या घटना नेहमीच घडतात. अशावेळी मृतांची ओळख न पटल्यास पोलिसांची पंचाईत होते. ओळख पटविण्याचे आव्हान असते. त्यामुळे लोहमार्ग पोलिस अशा प्रवाशांचे ‘डीएनए’ सुरक्षित ठेवतात. गेल्या २१ महिन्यांत ४७ प्रवाशांचे डीएनए सुरक्षित ठेवले गेले आहेत.

रेल्वेत अचानक प्रवाशाची प्रकृती खालावून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातून ओळख न पटलेल्या प्रवाशांचे डीएनए लोहमार्ग पोलिसांकडून न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत सुरक्षित ठेवले जातात. नातेवाईकांना व लोहमार्ग पोलिसांना त्यातून बरीच मदत होते.

धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न, रेल्वे रुळावर कटून मृत्यू किंवा प्रवासात अचानक प्रकृती खालावून झालेला प्रवाशाचा मृत्यू असो, अशा घटनांमध्ये बहुतांश वेळा मृताची ओळख पटत नाही. त्यामुळे तपासात लोहमार्ग पोलिसांना मोठी अडचण निर्माण होते. नातेवाईक पोलिसांकडे येतात. मात्र, काहीच पुरावा नसल्याने पत्ता लागत नाही. अशावेळी लोहमार्ग पोलिस नातेवाइकांची दोन दिवस वाट पाहतात. मृतदेह दोन दिवस शासकीय रुग्णालयात ठेवतात.

जर कुणी पुढे आले नाही. तर डॉक्टरांच्या मदतीने डीएनए नमुने घेऊन ते न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत ठेवण्यात येतात. नातेवाइकांनी मृतकाच्या बाबतीत दावा केल्यास डीएनए नमुना पोलिसांसाठी पुरावा ठरतो.

दोन वर्षांत १५२ जणांचा अकस्मात मृत्यू

वर्ष २०२२ मध्ये ८६ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यातील ५५ लोकांची ओळख पटली. उर्वरित ३१ लोकांची ओळख पटलेली नाही. तसेच सप्टेंबर २०२३ पर्यंत ६६ लोकांची अकस्मात म्हणून मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यात ५० लोकांची ओळख पटली उर्वरित १६ जणांची माहिती मिळाली नाही. गेल्या २१ महिन्हिंत ४७ व्यक्तींची अद्यापही ओळख पटलेली नाही. यात बेघरांची संख्या अधिक असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

रेल्वेत अकस्मात मृत्यूच्या घटना नेहमी घडतात. काहींची ओळख पटते काहींची पटत नाही. अशावेळी नातेवाइकांनी आक्षेप घेतल्यास पुरावा काहीच राहात नाही. त्यामुळे डीएनएचा नमुना ओळख पटविण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. याकरिता आम्ही तो प्रयोगशाळेत सुरक्षित ठेवतो.

मनिषा काशीद, पोलिस निरीक्षक- लोहमार्ग पोलिस ठाणे, नागपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT