Vaccination sakal
नागपूर

नागपूर : लसीकरणातील पहिला डोज १ डिसेंबरपासून बंद

नागरिकांनी २० दिवसांत मोफत लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.

राजेश प्रायकर -सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरातील लसीकरणासाठी पात्र पावणे तीन लाख नागरिकांनी अद्याप पहिला डोजही घेतला नाही. या नागरिकांना आता केवळ २० दिवसांत मोफत लसीकरण करून घेण्याची शेवटची संधी आहे. येत्या १ डिसेंबरपासून महापालिका पहिल्या डोजची सुविधा बंद करणार आहे. त्यामुळे नागरिकांना १ डिसेंबरपासून खाजगी रुग्णालयात पैसे खर्च करून लस घ्यावी लागणार आहे. नागरिकांनी २० दिवसांत मोफत लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.

शहरात लसीकरणासाठी पात्र १८ वर्षांवरील १९ लाख ७३ हजार नागरिक आहेत. जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले असून आतापर्यंत १६ लाख ९२ हजार नागरिकांनी लसीचा पहिला डोज घेतला. लसीकरण सुरू होऊन दहा महिन्यांचा कालावधी लोटला, परंतु अद्यापही २ लाख ७० हजारांवर नागरिक पहिल्या डोजपासूनही वंचित आहेत.

शहरात १६० केंद्रांवर लसीकरण सुविधा आहे. एवढेच नव्हे अनेक लसीकरण केंद्र ओस पडले. त्यामुळे कमीत कमी वेळेत लसीकरण करण्याची संधी आहे. परंतु आता केवळ पुढील २० दिवस मोफत लसीकरणाची सुविधा राहणार आहे. महापालिका पहिल्या डोजची सुविधा केवळ ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू ठेवणार आहे. त्यानंतर नागरिकांना खाजगी रुग्णालयात पैसे देऊन पहिला डोज घ्यावा लागणार आहे.

अनेक नागरिक अजूनही लसीकरणाबाबत भीती बाळगून आहे. त्यांची भीती दूर करण्यासाठी तसेच मुस्लिम समुदायाने लसीकरणासाठी पुढे यावे, म्हणून धर्मगुरूंचेही सहकार्य घेण्यात येत आहे. पुढील दिवसांत जास्तीत जास्त लसीकरणासाठी घरोघरी पथक पाठविण्याची तयारीही महापालिकेने केली आहे.

आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी काल, दोन डोज घेणाऱ्यांनाच कार्यालयात प्रवेश दिला जाईल, असे आदेश काढले. या आदेशाची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली. परंतु महापालिकेतच दोन्ही डोजबाबत तपासणी करताना कुणीही दिसून आले नाही. महापालिकेत आजही नेहमीप्रमाणेच नागरिकांची वर्दळ होती. दोन डोजच्या प्रमाणपत्राचीही तपासणी झाली नसल्याने आयुक्तांच्या आदेशाला मनपा अधिकाऱ्यांनीच केराची टोपली दाखविल्याचे चित्र दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राज्याच्या दर्शनाला

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT