chor
chor 
नागपूर

नागपूरच्या चोरट्यांनी बदलले "टार्गेट', या घटनांमध्ये झाली वाढ

सकाळवृत्तसेवा

नागपूर : कोरोनाचे संकट पाहता शहरात लॉकडाऊन आणि संचारबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. तसेच शहरातील वाईन शॉप, बीअरबार, ढाबे आणि देशी दारूचे दुकान बंद करण्यात आले. त्यामुळे मोहफुलाच्या दारूपासून ते विदेशी दारूपर्यंतच्या बाटल्या चौपट किमतीने विकल्या जात आहेत. ही बाब हेरून चोरट्यांनी वाईन शॉप आणि बीअर बारला टार्गेट केले आहे. शनिवारी शहरातील आणखी दोन बियर बार चोरट्यांनी फोडल्याच्या घटना उघडकीस आल्या. चोरट्यांनी लाखोंचा मद्यसाठा लंपास केल्याची माहिती आहे.

एमआयडीसी, नंदनवन व सावनेरमधील बार व देशी दारूचे दुकान फोडल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी तळीरामांनी आणखी दोन बीअरबार फोडून मद्यसाठा लंपास केला. पहिली घटना जरीपटका भागात उघडकीस आली. दारूड्यांनी सोनू कृष्णानी यांच्या मालकीचे बीअर बार फोडून मद्यसाठा चोरी केला. या प्रकरणी जरीपटका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असतानाच शनिवारी दुपारी सदरमधील गड्डीगोदाम येथील कश्‍मीर बीअर बार फोडण्यात आल्याची माहिती समोर आली.

हा बार बंटी सरदार यांच्या मालकीचा असल्याची माहिती आहे. एकाच दिवशी दोन बार फोडण्यात आल्याच्या घटनांनी पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये खळबळ उडाली आहे. दारू मिळत नसल्यामुळे अनेकांनी वेगवेगळ्या क्‍लुप्त्या शोधून काढल्या आहेत. यामध्ये स्पिरीट, गांजा, व्हाईटनर याचाही उपयोग नशा करण्यासाठी सुरू केला असल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT