Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University sakal
नागपूर

Nagpur University : विद्यापीठाच्या बोगस पदवीचे ‘आंध्र कनेक्शन’; एकाला अटक, दोघे फरार

नागपूर विद्यापीठाच्या नावाने बोगस पदवी तयार करून त्याद्वारे विदेशात नोकरी मिळविण्यासाठी बी.ई. अभ्यासक्रमाचे बोगस पदवी आणि गुणपत्रिका प्रमाणपत्र तयार केल्याची धक्कादायक माहिती आली समोर.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नावाने बोगस पदवी तयार करून त्याद्वारे विदेशात नोकरी मिळविण्यासाठी बी.ई. अभ्यासक्रमाचे बोगस पदवी आणि गुणपत्रिका प्रमाणपत्र तयार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यापीठात सापडलेली बोगस पदवी आणि गुणपत्रिकेचे ‘आंध्र कनेक्शन’ असल्याची माहिती आहे. यापूर्वी इराणमध्ये नोकरीसाठी तयार केलेल्या बोगस पदव्यांचेही आंध्र कनेक्शन उघड झाले होते.

रमनकुमार सितारामुलू बंगारू (वय ४०, रा. पुतूरवारी, तोटामार्ग, पाचवी लाईन, गुंटूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रतनबाबू आनंदराव मेकातोटी (वय ४०, रा. नल्लापाडू), कांचरला रोशन कांचरला कोटेश्‍वरराव अशी फरार आरोपींची नावे आहेत. विद्यापीठाला भारतातील इराक दूतावासाकडून इराकमध्ये नोकरी शोधणाऱ्या २७ विद्यार्थ्यांची माहिती मागितली होती. यादीत नमूद विद्यार्थ्यांची माहिती घेण्यासाठी विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांना मेल पाठवले होते. यावेळी व्हेरीफिकेशन दरम्यान सर्व महाविद्यालयांनी विद्यापीठाला विद्यार्थ्यांनी त्या संस्थांमध्ये प्रवेश दिला नसल्याचे स्पष्ट केले होते.

त्यानुसार विद्यापीठाने इराक दूतावासाला याची माहिती दिली. या विद्यार्थ्यांनी वरील महाविद्यालयांच्या गुणपत्रिका इराकमधील कंपन्यांकडे जमा करून नोकऱ्या मिळवल्या होत्या. या सर्व गुणपत्रिकांवर माजी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ आणि परीक्षा नियंत्रक डॉ. एस.पी. काणे यांच्या स्वाक्षरी असल्याची माहिती समोर आली आहे. आताही गुणपत्रिका आणि व्हेरीफिकेशनसाठी आलेल्या दोघांनीही सुमारे आठ गुणपत्रिका आणि पदवी आणली होती. त्यांना विचारणा केल्यावर त्यांना मुलीने कोणत्या महाविद्यालयातून पदवी घेतली त्याचे नावही आठवत नव्हते.

असे आले प्रकरण समोर

गुरुवारी (ता.८) दुपारी दोन वाजताच्या सुमारास विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील परीक्षा भवनात आले. त्यांनी कांचरला रोशन कांचरला कोटेश्‍वरराव या नावाची गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र सादर करीत, त्याचे व्हेरिफिकेशन करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी तिचे नातेवाईक असल्याची बतावणी केली. परीक्षा विभागाकडून व्हेरिफिकेशन केले असता, दिलेल्या पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका बोगस असल्याची बाब समोर आली.

याबाबत परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी दोघांनाही थांबवून ठेवले. मात्र, त्यापैकी रतनबाबू आनंदराव मेकातोटी हा पसार झाला. दरम्यान रमनकुमार बंगारू याला डांबून ठेवत, त्याची माहिती पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी परीक्षा भवन गाठून त्याला ताब्यात घेतले. याशिवाय त्याच्यासह तिघांवरही गुन्हा दाखल करीत बंगारूला अटक केली.

इराणप्रकरणी गुन्हा केव्हा नोंदविणार?

विद्यापीठाने यावेळी व्हेरिफिकेशनसाठी आलेल्या बोगस पदव्याबाबत तत्परता दाखवित अंबाझरी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. मात्र, यापूर्वी इराणमध्ये नोकरी लावून देण्याच्या नावावर २७ जणांच्या बोगस पदवी प्रकरणात साधी तक्रारही विद्यापीठाकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशीच झालेली नाही. याऊलट विद्यापीठाने ती तक्रार न केल्यानेच अशा बोगस पदव्या तयार करणाऱ्यांची हिम्मत वाढल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT