Nagpur Vidarbha heavy Rain 3 girls death in lightning 9 people injured sakal
नागपूर

नागपूर : वीज कोसळून तीन मुली मृत्युमुखी

नऊ जण जखमी; यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विदर्भात आज बुधवारी काही जिल्ह्यात वादळवाऱ्यासह पाऊस झाला. दरम्यान, शेतात काम करत असताना अंगावर वीज कोसळल्याने तीन मुलींचा मृत्यू झाला. तर नऊ जण जखमी झाले. तसेच वीज पडून बैलजोडी मृत्युमुखी पडली.

दिग्रस/पुसद (जि. यवतमाळ) : दिग्रस व पुसद तालुक्यात वीज कोसळून दोन मुलींचा मृत्यू झाला. यातील पुसद तालुक्यातील एक मुलगी दुसऱ्‍याच्या शेतात कामाला गेली होती. तर, दिग्रस तालुक्यातील माळहिवारा येथील सात वर्षीय चिमुकली ही आईवडिलांसह शेतातील झोपडीतच राहत होती.

माळहिवरा शेतशिवारात बुधवारी दुपारी चारच्या सुमारास वीज पडली. यात रोहिणी शंकर आगोसे (रा. माळहिवरा) या चिमुकलीचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत पुसद तालुक्यातील इनापूर शिवारात शेतात कापूस बियाण्यांची लागवड करताना अंगावर वीज पडून पल्लवी दिलीप चव्हाण (वय १६) या शेतमजूर मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर इतर पाच जण जखमी झाले. जखमींमध्ये रेखा मधुकर राठोड (वय १७), शांता धर्मा चव्हाण (वय ६५), देवराम कनिराम चव्हाण (वय ६०) व रविना अनिल चव्हाण (वय १८) यांचा समावेश आहे.

कोरपना (जि. चंद्रपूर) : शेतात कापूस टिबण्याचे काम करीत असतानाच वीज कोसळून एक ठार, तर पाच जण जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास बेलगावनजीक कोलामगुडा परिसरात घडली. मृताचे नाव गौरी खंदेराव कोडापे (वय १६, रा. बेलगाव) असे आहे. जखमींमध्ये मानकू सिडाम (वय १३), आयू कोडापे (वय १३), मनीषा आत्राम (वय १४), निर्मला मडावी (वय १८) आणि साबरी कोडापे (वय २०) यांचा समावेश आहे.

जखमींना गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बेलगाव येथील कोलामगुडा येथे कोडापे यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात कापूस टिबण्याचे सध्या काम सुरू आहे. बेलगाव येथील गौरी खंदेराव कोडापे, मानकू सिडाम, आयू कोडापे, मनीषा आत्राम, निर्मला मडावी आणि साबरी कोडापे या कामावर गेल्या होत्या.

गोठ्यात बांधलेली बैलजोडीही दगावली

मारेगाव (जि. यवतमाळ) : वीज पडून गोठ्यातील बैलजोडी जागीच ठार झाली. ही घटना आज दुपारी तालुक्यातील सालई पोड (खंडणी) गावाजवळील शेतशिवारात घडली. लक्ष्मण चंडकू टेकाम (वय ५५) यांच्या शेतातील गोठ्यात बैलजोडी बांधलेली होती. दरम्यान, वीज कोसळल्याने गोठ्यातील दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला. यात दोन मजुरांना किरकोळ धक्का बसला.

आईच्या डोळ्यांदेखत गेला चिमुकलीचा जीव

रोहिणी ही माळहिवरा येथील शेतात आपल्या आईसह गेली होती. दरम्यान, वादळी वाऱ्‍यासह पाऊस सुरू झाल्याने दोघीही सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी लगबगीने निघाल्या. परंतु, त्याच वेळी चिमुकलीच्या अंगावर वीज पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. आईने एकच हंबरडा फोडला. तिच्या डोळ्यांदेखत मुलगी गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: १८ वेळा चाकूने वार, नंतर गळा चिरला; १४ वर्षाच्या मुलाने १० वर्षांच्या मुलीला संपवलं, 'त्या' चुकीमुळे प्रकरणाचा उलगडा

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Asia Cup 2025: भारताच्या ७ खेळाडूंचे आशिया चषक संघात पदार्पण; त्यापैकी पाच प्लेइंग इलेव्हनमध्ये नक्की दिसणार

Latest Marathi News Updates : नळदुर्ग रोडवर चालत्या एसटी बसने घेतला पेट

Chandrababu Naidu: ‘एनडीए’च्याच उमेदवाराला पाठिंबा; चंद्राबाबू नायडू यांचे स्पष्टीकरण, राधाकृष्णन यांचे केले कौतुक

SCROLL FOR NEXT