बीसीसीआयने आशिया कप २०२५ साठी १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला आहे.
सूर्यकुमार यादव कर्णधार तर शुभमन गिल उपकर्णधार म्हणून निवडले गेले आहेत.
सात खेळाडू पहिल्यांदाच आशिया कपमध्ये खेळणार आहेत.
Asia Cup 2025 India squad full list with debutants : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नुकताच आशिया कप २०२५ साठी १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला आहे. ९ ते २८ सप्टेंबरदरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी सूर्यकुमार यादव कर्णधार म्हणून नेतृत्व करणार आहे, तर शुभमन गिलला उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.