Nagpur Water supply cut from eight water tanks tomorrow
Nagpur Water supply cut from eight water tanks tomorrow sakal
नागपूर

नागपूर : आठ जलकुंभातून उद्या पाणीपुरवठा बंद

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महापारेषण येत्या बुधवारी देखभाल, दुरुस्तीची कामे करणार असल्याने मनसर उपकेंद्रातून सहा तास वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. परिणामी नवेगाव खैरीतून शहराला पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे शहरातील आठ जलकुंभाअंतर्गत वस्त्यांमध्ये बुधवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

महापारेषणच्या कामामुळे मनसर उपकेंद्रातून वीजपुरवठा बंद करण्यात येणार आहे. परिणामी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवेगाव खैरी पंपिंग स्टेशनमधून गोधनीतील पेंच ४ जलशुद्धीकरण केंद्राला सहा ते सात तास पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र बुधवारी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या जलशुद्धीकरण केंद्रातून आठ जलकुंभांना पाणी पुरवठा होतो. जलशुद्धीकरण केंद्र बंद राहणार असल्याने आशीनगर, लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर व नेहरूनगर झोनमधील वस्त्यांना पाणीपुरवठा होणार नाही.

पाणीपुरवठा बंद राहणारे जलकुंभ व वस्त्या

नारा : निर्मल सोसायटी, आराधना कॉलनी, शंभूनगर, शिवगिरी ले-आऊट, नुरी कॉलनी, आर्यनगर, नारागाव, वेलकम सोसायटी, देवीनगर, प्रीति सोसायटी.

नारी, जरीपटका : भीम चौक, हुडको कॉलनी, नागार्जुना कॉलनी, कस्तुरबानगर, कुकरेजानगर, मार्टिननगर, विश्वासनगर, खुशीनगर, एलआयटी कॉलनी, एमआयजी कॉलनी, सुगतनगर, कबीरनगर, कपिलनगर, कामगारनगर, रमाईनगर, दीक्षितनगर, सन्यालनगर, मानवनगर, शेंडेनगर, राजगृहनगर, लहानुजीनगर.

लक्ष्मीनगर : नवे सुरेंद्रनगर, देवनगर, सावरकरनगर, विवेकानंदनगर, विकासनगर, हिंदुस्तान कॉलनी, प्रगतीनगर, गजानननगर, सहकारनगर, समर्थनगर, प्रशांतनगर, अजनी, उरुवेला कॉलनी, राहुलनगर, नवजीवन कॉलनी, छत्रपतीनगर पावर हाऊसजवळ, कानफाडेनगर, विश्रामनगर, संताजीनगर.

धंतोली : धंतोली, काँग्रेसनगर, हम्पयार्ड रोड, तकिया झोपडपट्टी ओंकारनगर १ व २ रामटेकेनगर, रहाटेनगर टोली, अभयनगर, गजानननगर, जोगीनगर, पार्वतीनगर, भीमनगर, जय भीमनगर, जयवंतनगर, शताब्दीनगर, कुंजीलालपेठ, हावरापेठ, बालाजीनगर, चंद्रनगर, नालंदानगर, रामेश्वरी, बॅनर्जी ले-आऊट.

म्हाळगीनगर : सन्मार्गनगर, अन्नपूर्णानगर, नवे नेहरूनगर स्लम, विघ्नहर्तानगर, संतोषीनगर, सरस्वतीनगर, शिवशक्तीनगर, जानकीनगर, न्यू अमरनगर, विज्ञाननगर, गुरुकुंजनगर, म्हाळगीनगर, गजानननगर,सूर्योदयनगर, महालक्ष्मीनगर, महात्मा गांधीनगर, अष्टविनायक कॉलनी, राधाकृष्णनगर, शिवाजीनगर, मां भगवतीनगर.

श्रीनगर : सुंदरबन, ८५ प्लॉट, सुयोगनगर, साकेतनगर, अरविंद सोसायटी, बोरकुटे ले-आऊट, पीएमजी सोसायटी, विजयानंद सोसायटी, संताजी सोसायटी, डोबीनगर, म्हाडा कॉलनी.

नालंदानगर :जय भीमनगर, पार्वतीनगर, ज्ञानेश्वरनगर, कैलासनगर, बालाजीनगर, चंद्रनगर, नाईकनगर, मित्रनगर, गजानननगर, रामेश्वरी, बॅनर्जी ले-आऊट, नालंदानगर, बँक कॉलनी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT