nagpur weather update cold weather in nagpur from december imd marathi news Esakal
नागपूर

Nagpur Weather : यंदा विदर्भातील हिवाळा सामान्यच, डिसेंबरमध्ये गारठणार; पूर्वार्धात गुलाबी, तर उत्तरार्धात हुडहुडी

उत्तरार्धात मात्र कडाक्याची थंडी पडणार असल्याचे संकेत, प्रादेशिक हवामान विभागाने दिले

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून विदर्भात हलका गारठा जाणवायला लागला आहे. नोव्हेंबर महिन्यात सौम्य अर्थात गुलाबी थंडी राहणार आहे. उत्तरार्धात मात्र कडाक्याची थंडी पडणार असल्याचे संकेत, प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहेत.

भारतीय हवामान विभागाने ‘एल निनो’मुळे यावर्षीच्या हिवाळ्यात विशेषतः नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात थंडी कमी राहणार असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भातही जवळपास अशीच परिस्थिती म्हणजेच सामान्य तापमान राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

विदर्भातील एकूणच हिवाळा व थंडीबद्दल माहिती देताना प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू म्हणाले, पुढील महिनाभर सामान्य हिवाळाच अपेक्षित आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच यंदाच्याही दिवाळीत गुलाबी थंडी राहणार आहे. मात्र डिसेंबर सुरू होताच थंडीचा जोर वाढणार आहे.

पूर्वइतिहास लक्षात घेता विदर्भात डिसेंबर आणि जानेवारी या दोनच महिन्यांत सर्वाधिक गारठा जाणवतो. यंदाही तीच परिस्थिती कायम राहणार आहे. मात्र उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू होताच १५ डिसेंबरनंतर हुडहुडी वाढून, पारा दहाच्या खाली येण्याची दाट शक्यता आहे. १५ जानेवारीपर्यंत विदर्भात अधूनमधून थंडीच्या लाटा येत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि पाच वर्षांपूर्वीचा थंडीचा विक्रम यंदाही मोडीत निघण्याची शक्यता कमीच असल्याचे ते यावेळी म्हणाले.

स्वेटर्स विक्रेत्यांच्या दुकानांवर गर्दी

थंडी वाढू लागल्यामुळे हळूहळू स्वेटर्स, जॅकेट, जर्किन्स, मफलर्स व कानटोपरे बाहेर पडायला सुरवात झाली आहे. त्यामुळे खरेदीसाठी स्वेटर्स विक्रेत्यांच्या दुकानांवरही ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे.

पाच वर्षांपूर्वी पारा ३.५ अंशावर

गेल्या शंभर वर्षांतील थंडीच्या इतिहासावर नजर टाकल्यास नागपूर व विदर्भातील पारा अनेकवेळा दहाच्या खाली आलेला आहे. पाच वर्षांपूर्वी २९ डिसेंबर २०१८ ला नागपूरचा पारा तब्बल ३.५ अंशांपर्यंत घसरला होता, जो आजवरचा विक्रम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT