Nagpur winter session sakal
नागपूर

Nagpur News: हिवाळी अधिवेशनाचे आज वाजणार सूप

आरोप-प्रत्यारोपानेच गाजले सभागृह

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मागील आठवड्यात सुरू झालेले हिवाळी अधिवेशन अंतिम टप्प्यात पोहोचले असून उद्या सूप वाजणार आहे. मागील आठवडा तसेच आतापर्यंत विधीमंडळाचे दोन्ही सभागृह सत्ताधारी व विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपानेच गाजले. कलगीतुरा, टोलेबाजीमुळे सभागृहात हंशा पिकला तर काही सदस्यांमध्ये कलगीतुराही रंगला. आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी विदर्भ, मराठवाड्याच्या प्रस्तावावर उत्तर देताना केलेल्या घोषणाच अधिवेशनाच्या फलित ठरल्या.(Nagpur News)

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यात यावा, अशी मागणी सातत्याने विरोधी पक्षांकडून करण्यात आली. मात्र, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधकांची मागणी फेटाळण्यात आली आहे.

त्यामुळे उद्या, शुक्रवारी अधिवेशनाचे सूप वाजणार आहे. यावरूनही सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. सभेतील विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी अधिवेशन दोनच आठवड्यात गुंडाळल्याचा आरोप केला तर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी विरोधकांची मानसिकता अधिवेशन कालावधी वाढवण्याची असती तर आमचीही तयारी होती, असे नमुद करीत विरोधकांवर खापर फोडले. १९ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाची सुरुवात झाली. विदर्भ, मराठवाड्याचे विषय कालपासून चर्चेला आले. यावर आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर देत अनेक घोषणा केल्या.

परंतु गेल्या आठ दिवसांत केवळ एकमेकांवर कुरघोडी, आरोपच जास्त झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नासुप्र जमिनीचा घोटाळा केल्याचा आरोप करीत विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केली. गायरान जमिनीच्या घोटाळ्यावरून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा व हकालपट्टीच्या मागणीनेही दोन दिवस गाजवले. आज माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावरील भूखंड घोटाळ्याच्या आरोपाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सावंत यांनी केली. एकमेकांवर आरोप, कुरघोडीतच आतापर्यंतचे कामकाज गाजले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

OBC Reservation: ओबीसी आरक्षणासाठी मोठा आवाज; प्रा. लक्ष्मण हाके यांचे राज्य सरकारला आवाहन, समाजाच्या हक्कांसाठी संघर्षाची हाक!

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

SCROLL FOR NEXT