crime news
crime news Sakal
नागपूर

नागपूर : सहा पोलिसांकडून महिलेला मारहाण

प्रमोद काळबांडे

नागपूर : ``पायामंधी रस्सी बांधली. अस्से वरे पाय केले. सहा-सहा पोलिसायनं पटट्या-पट्ट्यानं मारयलं. एक रुके त दुसरा भीडे. बस्स पट्टेच मारन्याचं काम केलं. मारनारे सारे मान्सच होते. लेडिज पोलिस कोनीबी न्होती.`` रंजना हंसराज नाडे सांगत होती.

भगवाननगर येथील एका खासगी हॉस्टिपलमध्ये दाखल केलेल्या रंजनाने `सकाळ` प्रतिनिधीला तिची आपबिती सांगितली. तिच्या गालावर मारल्याचे लालभडक व्रण ताजे होते. पोटऱ्या सुजलेल्या आणि तळपायावर मारल्याची चिन्हे दिसत होती. हुडकेश्वर पोलिस स्टेशमधील सहा पुरुष पोलिसांनी तिचे पाय बांधून पट्ट्याने बेदम मारहाण केल्याचा आरोप तिने केला. यासंबंधाने हुडकेश्वर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक कविता इसारकर यांचीही `सकाळ` प्रतिनिधीने भेट घेतली. ``मी प्रत्यक्ष हजर होते. तिला मुळीच मारहाण केली नाही. पुरुष पोलिसांनी मारहाण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तिला स्टेशनमध्ये आणल्यावर फिट आली. येथे महल्ले डाॅक्टर आले होते. त्यांनी तिला तपासले. मिरगीची फिट असल्याचे सांगितले.``, अशी माहिती इसारकर यांनी दिली.

हॉस्पिटलच्या बाहेर रजंनाच्या वस्तीतील अनेक महिला आणि पुरुषांची गर्दी जमली होती. त्यांना या घटनेबाबत विचारले. ``तिले फिटची बिमारी नायी सायेब. अगूदर कधीच फिट नायी आली. रामसिंगन अॅटोत टाकून आन्ली. गोदतं उचलून आमी तिले पलंगावर टाकली. पुरच सिरियस होती. चालायचा होस नायी. मारल्यानंत थे लुस्त पडली होती``, मोना नाग्याबाई मानकर यांनी माहिती दिली.

`तिला कधीच फिट नायी आली`

रंजनाची बहीण सांगू लागली. ``रामसिंग दाजीनं गोदत उचलून आन्लं. तिचं हातपाय लगीत सुजलं होतं. आन्ल्याच्या बाद तिले खूबच फिट आली. फिट आली त ती मरायच्या काबील होत होती. तिला कधी फिट नायी आली. पहिली दफा होये. तिचं आपरेशन लय भारी झालं. पहिल्या पोरायच्या वक्ती. इतकं भारी आपरेशन झालं का तुमाले काय सांगू. दोन डाव लेकरायचं सिजर झालं. लगीत भारी झालं. ती लय फिट येवून पडली. हात पसरवून दिला. ती बावरबुवर झाली. मले मारलं हाये. मले वाचवा, बडबडली. माह्यी सख्खी बहीण होये थे.``

हॉस्पिटलमध्ये दाखल नाही?

``पोलिस स्टेशनमध्ये रंजनाला फिट आली म्हणता. आरोपी म्हणून ताब्यात घेतले असता मग तिला हॉस्पिटलमध्ये दाखवले असालच?`` असा प्रश्न कविता इसारकर यांना केला असता. त्या `हो` म्हणाल्या. `कुठल्या? सरकारी हॉस्पिटलमध्ये का?` असा प्रश्न केला. तर त्यावर `हो अर्थातच` असे त्या म्हणाल्या. `त्याबाबत डिटेल द्या` म्हटल्यावर इसारकर यांनी त्यांचे सहकारी सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल भुजबळ यांना विचारले. त्यावर भुजबळ यांनी `सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले नाही. तिला घरी पाठविले` असे सांगितले.

`शिक्षा करा, मारहाण का केली?`

``चोरीच्या आरोपाखाली ताब्यात घेतले असताना बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करणे आणि तेही पुरुष पोलिसांनी, हे कोणत्या नियमात बसते? न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यास तिला योग्य ती शिक्षा करता आली असती. गरीब आणि तेही अनुसूचित जातीच्या महिलेला मारहाण करणे अत्यंत गंभीर आहे. तिला दवाखाण्यात दाखल न करता घरी पाठवून देणे. हे शंकास्पद आहे. या मारहाणीची उच्चस्तरीय चौकशी करावी, यासाठी उद्या पोलिस आयुक्तांना निवेदन देणार``, अशी माहिती माजी नगरसेवक योगेश मानकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT