Nagpur wrong use of ED CBI in state MLA Rohit Pawar sakal
नागपूर

पवार देशमुख कुटुंबासोबत; अनिल देशमुख लवकर बाहेर येतील - रोहित पवार

आमदार रोहित पवार यांनी काटोल येथे विकासकामांचे भूमिपूजन केलं.

सकाळ वृत्तसेवा

काटोल : राज्यातील सरकार पाडण्यासाठी ईडी आणि सीबीआय या संस्थांचा गैरवापर करण्यात येत आहे. महागाईचा भडका उडाल्यानंतरही त्यावर न बोलत फक्त विरोधक राष्ट्रपती राजवट राज्यात कशी लागू होईल, यावर भर देत आहेत. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडणार असल्याचे सूतोवाच राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला. सोबतच काटोलचे आमदार अनिल देशमुख लवकर बाहेर येथील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांच्या वाढदिवसानिमित्त काटोल येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ७२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंचायत समिती काटोलच्यावतीने रक्तदान शिबिर व महिला आरोग्य तपासणी शिबिर सोमवारी घेण्यात आले. त्याप्रमाणे काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्रात कोट्यवधींच्या निधीतून मंजूर झालेल्या विकासकामांचे सोमवारी भूमिपूजन पार पडले. काटोल दौऱ्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार उपस्थित होते.कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

आमदार पवार म्हणाले की, केंद्र सरकारने अतिरिक्त कर वाढविला म्हणून पेट्रोल व गॅसचे दर वाढल्याने महागाई वाढली. महाराष्ट्र राज्याचे केंद्र शासनाकडे २८ हजार कोटी केंद्राकडे थकबाकी आहे. अनेक अडथळे आणून महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करून राष्ट्रपती राजवट लावण्याचा केंद्राचा डाव आहे. मात्र, त्यात केंद्र शासन कधीही यशस्वी होणार नाही. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार रोहित पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून आरती अनिल देशमुख, जि.प.सदस्य सलिल देशमुख, जि.प.सदस्य समीर उमप, माजी नगराध्यक्ष राहुल देशमुख, राष्ट्रवादी प्रवक्ते प्रवीण कुंटे, पं .स. सभापती धम्मपाल खोब्रागडे, उपसभापती अनुराधाताई खराडे, अरुण उईके, निशिकांत नागमोते, चंदाताई देव्हारे, लताताई धारपुरे, प्रतिभाताई ठाकरे, चंद्रशेखर कोल्हे, चंद्रशेखर चिखले, संजय डांगरे उपस्थित होते.

प्रास्ताविक पं.स.सभापती धम्मपाल खोब्रागडे यांनी केले. संचालन राजेंद्र टेकाडे यांनी केले तर आभार उपसभापती अनुराधाताई खराडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी माजी उपसभापती अनुप खराडे, गट विकास अधिकारी संजय पाटील, गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के, नरेश भोयर, राष्ट्रवादी काटोल शहराध्यक्ष गणेश चन्ने, गणेश सावरकर, संदीप ठाकरे, माजी नगरसेवक संदीप वंजारी, बाजार समितीचे माजी सभापती तारकेश्वर शेळके, उज्ज्वल भोयर, डॉ.राजू कोतेवार यांनी सहकार्य केले.

अनिलबाबू लवकरच बाहेर येतील

राज्यात ईडी, सीबीआयचा गैरवापर होत आहे. अनिलबाबू यांच्या घरावर १२२ वेळा छापे घालून त्यांचे व परिवाराचे मानसिक खच्चीकरण केले जात आहे. तुमचे आमदार निर्दोष आहे. देशमुख कुटुंबासोबत पवार कुटुंब आहे. अनिलबाबू लवकर बाहेर येतील, अशी जाहीर कबुली आमदार रोहित पवार यांनी दिली.

६७४ कोटींचा निधी मंजूर

काटोल विधानसभेची विकासकामासाठी सन २०१९ ते२०२२ या कालावधीत ६७४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून अनेक विकासाची कामे प्रगतिपथावर आहेत. यासाठी जि.प.सदस्य सलिल देशमुख यांनी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करून कामे खेचून आणली, हे विशेष !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT