crime news
crime news esakal
नागपूर

नागपूर : घराच्या वाटणीवरून तरुणाला भोसकले

सकाळ वृत्तसेवा

बुटीबोरी : घराच्या वाटणीचा वाद विकोपास जाताच, आरोपीने तरुणास चुकीची माहिती देत, दुचाकीने नागपूरहून बुटीबोरी येथे आणले आणि वाटेत त्याच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्यात तो तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना बुटीबोरी (नागपूर ग्रामीण) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील बोथली शिवारात बुधवारी रात्री घडली. आरोपीस अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

शंकर हेमराज उमरेडकर (२९, रा. बाजार चौक, कोहळी, ता. कळमेश्वर) असे जखमी तरुणाचे तर मोरेश्वर तुकाराम पराते (४२, रा. लालझेंडा चौक, पाचपावली, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शंकर आणि मोरेश्वर यांच्या मागील काही वर्षांपासून घराच्या वाटणीवरून वाद निर्माण झाल्याने त्यांची अधूनमधून भांडणे व्हायची.

दरम्यान, मोरेश्वरने शंकरला त्याची भिसीची रक्कम फसली आहे, अशी खोटी बतावणी करीत, ती रक्कम घेण्यासाठी सोबत बुटीबोरीला चालण्याची विनंती केली. त्यावर विश्वास ठेवत शंकर कोहळीहून नागपूरला आला आणि मोरेश्वरसोबत ॲक्टिव्हा दुचाकीने बुटीबोरीच्या दिशेने निघाला.

शंकर ॲक्टिव्हा चालवीत होता, तर मोरेश्वर मागे बसला होता. मोरेश्वरने त्याला बोथली शिवारात नेले आणि त्याच्याशी भांडण उकरून काढत चाकूने गळ्यावर वार केले. यात शंकर गंभीर जखमी झाला.त्याला उपचारार्थ नागपुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी शंकरची आई गीता हेमराज उमरेडकर (४७, रा. कोहळी, ता. कळमेश्वर) यांच्या तक्रारीवरून भादंवि ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT