Nagpur  
नागपूर

Nagpur : जिल्हा परिषदेची मान देशात उंचवली; रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रयोगाची श्रीलंकेकडून दखल

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्हा परिषदेच्या अभियांत्रिकी विभागाने रेन वॉटर हार्वेस्टिंग करून पाणी व त्यासोबत वीज बचत आणि इमारतीचे तापमान थंड ठेवण्यात यशस्वी प्रगोय केला. या प्रकल्पाची दखल युनेस्काने घेतली. केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने याचा सन्मान केला.

आता श्रीलंका सरकारने या उपक्रमाची दखल घेत सरनेट या संस्थेद्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड केली आहे. ग्रामीण पाणी पुरवठा यांत्रिकी विभागाचे उपअभियंता नीलेश मानकर या परिषदेत प्रयोगाचे सादरीकरण करतील.

श्रीलंका येथील वॉटर मॅनेजमेंट इन्स्टीट्यूट, बतारमुल्ला येथे ही परिषद सुरू आहे. १७ ते १८ व २० ते २३ मे या कालावधीत रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि त्याची साठवणूक पद्धती इतर विषयांवर या परिषदेत उपभियंता मानकर नागपूर जिल्हा परिषदेने राबविलेल्या या प्रकल्पांचे सादरीकरण करणार आहे़. संपूर्ण राज्यातून नागपूर जिल्हा परिषदेला हा बहुमान मिळाला आहे. पुणे येथील स्वयंसेवी संस्थेचा एक प्रतिनिधीचा समावेश आहे. जिल्हा परिषदेची मान संपूर्ण देशात उंचावली आहे.

या देशांचा समावेश

या आंतरराष्ट्रीय परिषदेत नेपाल, पाकिस्तान, मालदीव व भारतातील काही निवडक जणांची उपस्थिती आहे.

येथे राबवला प्रकल्प

जिल्ह्यातील आदासा मंदिर, भांडारबोडी, नगरधन आरोग्य केंद्रे येथे हा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यानंतर पुणे येथील राष्ट्रीय कार्यशाळेत या मॉडेलला प्रथम विशेष सन्मान मिळाला होता. जिल्हा परिषदेचे हे मॉडेल उपअभियंता मानकर व त्यांच्या टीमने सातासमुद्रापार नेले.

काय आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग मॉडेल?

अनेक जागी रेन वॉटर हार्वेस्टिंग शक्य होत नाही. अशा इमारतींचा अभ्यास करून छतावर पॅराफीट वॉल, विशिष्ट प्रकारचा उतार काढल्या जातो. छताला गळती व उष्णताविरोधक पेंट लावण्यात येतो. संपूर्ण वॉटर हार्वेस्टिंगचे पाणी रिचार्ज शॉप पद्धतीने साठविण्यात येते. ज्याचा फायदा इमारतीसमोरील वृक्ष, बागा जगविण्यासाठी आपोआप होतो. या सर्व प्रक्रियेमुळे इमारतीचे तापमानही कमी होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT