नागपूर : भारतीय नागरिक आपला भावनिक स्वभाव, प्राचीन संस्कृती, धर्म विविधता अशा अनेक गोष्टींसाठी ओळखले जातात. सण, घरगुती कार्यक्रम असो किंवा कुठली नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढवले असो; एकमेकांच्या मदतीला धावून जाताना भारतीय नागरिक कुठलाही कसूर करीत नाहीत. याचाच प्रत्यक अमेरिकेतील न्यू जर्सी येथील आला. हा भारतीय नागरिक आपल्याच संत्रा नगरीतील आहे, हेही विशेषच...
मिहीर पेंढारकर असे या तरुणाचे नाव आहे. तो न्यू जर्सीच्या ब्रांचबर्ग शहरातील कोरोना योद्धांना फेसशील्ड तयार करून देतो आहे. मिहीरचे शालेय शिक्षण नागपुरातील सोमलवार हायस्कूलमधून पूर्ण झाले. त्यानंतर लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ फेक्नोलॉजीमधून त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. 2004 साली त्याने अमेरिका गाठली असून, आता तो एका खासगी कंपनीमध्ये मोठ्या पदावर कार्य करतो आहे. जग एकीकडे कोरोनाशी लढत असताना त्यालादेखील समाजासाठी काही तरी करण्याची इच्छा होत होती. आपण आपल्याजवळील थ्रीडी प्रिंटरद्वारे फेसशील्ड तयार करू शकतो याची कल्पना त्याला सुचली.
ही कल्पना त्याने ब्रांचबर्ग शहरातील आपल्या फेसबुक ग्रुपवर शेअर केली आणि अनेक हात मदतीसाठी पुढे सरसावले. "ब्रांचबर्ग होप्स प्रकल्प' असे या उपक्रमाला त्यांनी नाव दिले. यूट्यूबची मदत घेत सुरुवातीला शंभर फेसशील्ड बनविण्याचे उद्दिष्ट त्यांनी पूर्ण केले. मात्र, त्यांच्या फेसशील्डला हळूहळू मागणी वाढू लागली.
डॉक्टर, परिचारिका, सलून, कारागृह आणि पोलिस कर्मचारी फेसशील्डसाठी संपर्क करू लागले. तर या उपक्रमासाठी आर्थिक मदत करणाऱ्यांचे हातदेखील वाढले आणि चार लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली. यातूनच सहा ते सात थ्रीडी प्रिंटर त्यांनी खरेदी केले. आजवर एक हजार 800 फेसशील्ड, 250 इअरगार्ड त्यांनी तयार केल्या असून, त्या कोरोना योद्धांना वितरित केल्या आहेत. या उपक्रमाचे ब्रांचबर्गमध्ये कौतुक होत आहे.
आई प्रेरणास्थान
माझी आई डॉ. प्रतिभा पेंढारकर नागपूरच्या मेडिकल रुग्णालयाची माजी अधिष्ठाता आहे. तिने कारकिर्दीमध्ये रुग्णांची सेवा केली. समाजाप्रती काही तरी करण्याचे तिच्यातील हे गुण माझ्यात आणि माझ्या बहिणीमध्ये आलेत. माझ्या आईपासून मला प्रेरणा मिळाल्यामुळे मी "ब्रांचबर्ग होप्स' हा प्रकल्प हाती घेऊन हे कार्य करू शकलो.
- मिहीर पेंढारकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.