krushna khopde  sakal
नागपूर

नाना पटोलेंचे ते ‘मोदी’ बगडगंजचे रहिवासी

आमदार खोपडे यांनी काढली घरडे कुटुंबाची कुंडली

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नाना पटोले यांच्या समर्थकांनी आणलेला गावगुंड मोदी हा नागपूरमधील बगडगंज येथील रहिवासी आहे. उमेश घरडे हा गावगुंड नाही तर त्याला दारूचे व्यसन आहे. स्वतःच्या बचावासाठी पटोले त्याला मोदी ठरवत असल्याचा दावा आमदार कृष्णा खोपडे यांनी केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतेच वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी भाजपच्यावतीने राज्यभर आंदोलने केली जात आहे. विविध पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यानंतर पटोले यांनी भंडारा येथील गावगुंड मोदी याच्याबाबत बोललो असा खुलासा केला होता. शुक्रवारी ॲड. सतीश उके तसेच पटोले यांच्या समर्थक उमेश घरडे नावाच्या व्यक्ती घेऊन पत्रकार परिषदेत आले.

घरडे ऊर्फ मोदी याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केल्याने तो घाबरून गेला होता. आपण नाना पटोले यांना दारूच्या नशेत शिवीगाळ केली होती. त्यामुळे त्यांनी आपणास मारण्याची धमकी दिली असे त्याने सांगितले. मात्र मोदी का म्हणतात हे तो स्पष्ट करू शकला नाही. पटोले यांच्या समर्थकांनी सादर केलेल्या मोदीची इत्युंभत माहिती आमदार कृष्णा खोपडे यांनी शोधून काढली. त्यांनी दिलेल्या माहिती नुसार लकडगंज पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या बगडगंज, आदर्शनगर, धावडे मोहल्ला उमेश घरडे १२ वर्षापासून राहत होते. या दरम्यान त्याला कोणीही मोदी म्हणून संबोधले नाही. हे त्याचे टोपण नावही नाही.

त्याच्या कुटुंबात मंगेश प्रेमदास घरडे, उमेश व दिनेश आहेत. ते सर्व बगडगंज येथे परिवारासोबत राहत होते. मंगेश व उमेश यांचे २०११ मध्ये लग्न झाले. उमेश हा लग्नानंतर त्याच भागातील नागदिवे यांचे घरी भाड्याने राहत होता. त्याला दोन मुली असून सध्या त्याची पत्नी घरगुती भांडणामुळे माहेरी कुही-मांढळ येथे बनसोड यांचे घरी दोन महिन्यांपासून राहत आहे. उमेश हा हातठेल्यावर भाजीपाला विकत असून कधी-कधी पंजाबी ढोल वाजवण्याचे काम करीत होता. वडिलोपार्जित शेती व घर भंडारा जिल्ह्यात आहे. उमेश हा काही दिवसांपासून गावात राहतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT