नागपूर

नागपुरात नऊशे खाटांचे जम्बो हॉस्पिटल; मास्टर प्लान तयार करण्याचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लाखो लोकांना कोरोना (coronavirus) व मृत्यू झाल्यानंतर सरकार व प्रशानसला जाग आली. उपचाराअभावी अनेकांनी जीव गमावल्यानंतर आता मानकापूर क्रीडा संकुल (Mankapur Sports Complex) येथे ९०० खाटांचे जम्बो हॉस्पिटल तयार करण्यात येणार आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता निश्चित आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मास्टर प्लान तयार करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut) यांनी दिले. (Nine hundred beds Jumbo Hospital in Nagpur)

कोरोनाबाबत पालकमंत्री राऊत यांनी पुन्हा आढावा बैठक घेतली. बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर जिल्हा हा तातडीने ऑक्सिजन निर्मिती बाबत स्वयंपूर्ण बनविण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे एकीकडे मानकापूर येथे नऊशे खाटांचे जम्बो हॉस्पिटल लवकर पूर्ण करताना जिल्ह्यात २५ ऑक्सिजन पीएसए उभारण्याचे नियोजन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. ऑक्सिजनची उपलब्धता यावरच पुढे बेडची उपलब्धता अवलंबून असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात दहा ठिकाणी क्रायोजनिक ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा संकल्प पूर्ण करा. कोरोना रुग्णांसाठी ५ हजार जंबो सिलेंडर उपलब्ध करणे पुढच्या लाटेत आवश्यक ठरणार आहे.

१ हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घेतले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक मोठ्या रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजन पुरवठा हे उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शहर व ग्रामीण भागात स्थानिक डॉक्टरांना होम कॉरेन्टाइनची शुश्रूषा करण्याचे निर्देश लवकरच राज्य शासन देणार आहे. त्यासाठी त्यांना मानधनही दिले जाईल. त्यामुळे शहरात व ग्रामीण भागामध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची यादी तयार करण्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या सीमा बंद करा

पोलिसांनी रिकामटेकड्यांना १४ दिवस सोडू नका, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले. तसेच येत्या काळात शहरातील प्रमुख बाजारपेठा व अन्य ठिकाणी गर्दी होणार नाही यासाठी पोलिस सक्त कारवाई करतील, असे स्पष्ट केले. जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.

(Nine hundred beds Jumbo Hospital in Nagpur)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

SCROLL FOR NEXT