Nagpur Municipal sakal
नागपूर

नागपूर : आता महापौर, नगरसेवक आठवडाभराचेच!

अनेकांच्या नावापुढे लागणार ‘माजी’चा शिक्का

राजेश प्रायकर

नागपूर : महापालिकेची लांबलेली निवडणूक अन् सत्ताधाऱ्यांचा चार मार्च रोजी संपुष्टात येणाऱ्या कार्यकाळामुळे प्रशासक नियुक्त होणे निश्चित आहे. येत्या ५ मार्चपासून महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह सत्तापक्ष नेते, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती अध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती व नगरसेवक यांच्या पदापुढे माजी लागणार आहे.

महापालिका पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ ४ मार्चपर्यंत आहे. ५ मार्चपासून महापालिकेत आयुक्त राधाकृष्णन बी. प्रशासक म्हणून कार्यभार पाहणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्राने स्पष्ट सांगितले. ४ मार्चच्या सायंकाळी किंवा ५ मार्चच्या सकाळी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सत्तापक्ष नेते, सभापतींना प्रशासनाने दिलेली वाहने परत करावी लागणार आहेत.

प्रशासकीय कामांमध्ये यामुळे काहीही बदल होणार नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. परंतु गेल्या वर्षभरात महापालिकेच्या वाहनातून फिरणाऱ्या पदाधिकाऱ्यांची पहिली रात्र मात्र झोपेशिवाय जाणार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, येत्या चार मार्चपर्यंतच महापौर किंवा नगरसेवक म्हणून मिरवता येणार आहे. पाच मार्चपासून सारेच पदाधिकारी व नगरसेवकांच्या पदापुढे माजी लागणार आहे. त्यामुळे नव्याने उमेदवारीची अपेक्षा असलेल्या एखाद्या नगरसेवकांनी गल्लीत फिरताना विरोधी कार्यकर्ता माजी नगरसेवक आले, असा टोला हाणू शकतात, अशीही चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manjari Railway Accident : पुणे-दौंड डेमूच्या धडकेत तीन तरुण जागीच ठार; हडपसर पोलिसांकडून कसून तपास सुरू

Solapur Crime:'बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेतून दोघांनी केला चेक लंपास'; पैसे दुसऱ्याच्या खात्यात जमा..

चोर-पोलिसांचा जुना खेळ संपला !; 'चोरट्यांचा फोन पे, गुगल पेवरून संवाद'; पोलिसांना सापडू नये म्हणून नवी शक्कल?

Latest Marathi Breaking News : नंदुरबारमध्ये शिंदेंना भाजपचा दे धक्का, एकनिष्ठ शिवसैनिकाचा शिवसेनेला रामराम

Pune ATS : एटीएसच्या तपासात झुबेरचे दहशतवादी मनसुबे उघडकीस; सुरक्षा यंत्रणेत खळबळ

SCROLL FOR NEXT