Tukaram-Mundhe
Tukaram-Mundhe 
नागपूर

आता खासगी रुग्णालये आयुक्त मुंढेंच्या रडारवर; उपचार नाकारल्यास खैर नाही

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरात काही खासगी रुग्णालयांकडून विविध आजाराच्या उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना कोरोना तपासणी अहवाल मागितला जात असून उपचार नाकारले जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली. अशी खासगी रुग्णालये मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या रडारवर आहेत. केवळ स्वॅब तपासणी अहवालासाठी उपचार नाकारणे वैद्यकीय नियमाचा भंग असून साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसारही कारवाईचा इशारा त्यांनी दिला.


कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खासगी रुग्णालयांत गरोदर महिला, इतर आजाराच्या रुग्णांवर स्वॅब तपासणी अहवाल आणण्याची सक्ती केली जात आहे. विशेष म्हणजे अनेकांची तपासणी झालेली नाही. त्यामुळे एखाद्याला ताप, खोकला असेल तर त्यांनाही पळवून लावले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून अशा रुग्णालयांना इशारा दिला.

 शासकीय रुग्णालयांप्रमाणेच खासगी रुग्णालयांनाही कोविड-19 निमित्त नियमांचे पालन करावे लागेल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. केवळ कोविड हॉस्पिटल नाही, असे म्हणून रुग्णांना उपचार नाकारता येणार नाही. न्यूमोनिया, दमाचे उपचारासाठी येणारे रुग्ण कोरोनोचा रुग्ण असू शकते. त्यानुसार त्यांच्यावर उपचार करावे लागणार आहे. त्यांची तपासणी करावी लागेल. शहरात खासगी रुग्णालयात कोविड-19 संदर्भातील नियमाचे पालन होताना दिसत नाही, अशी खंत आयुक्तांनी व्यक्त केली. आयएमए तसेच सर्वच प्रकारच्या डॉक्‍टरांनी ही नियमावली वाचावी, असे आवाहन करीत कुठल्याही रुग्णाकडे स्वॅब तपासणी अहवाल नसल्याने त्याला दाखल करून न घेणाऱ्या डॉक्‍टरांवर वैद्यकीय कायदे व साथरोग प्रतिबंधिक कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. या कारवाईस डॉक्‍टरांनी बाध्य करू नये, असेही ते म्हणाले.

रुग्णांनी तक्रार केल्यास कारवाई
कुठल्याही रुग्णालयांना स्वॅब घेऊन संबंधित रुग्णाची तपासणी करावी लागेल. स्वॅब घेण्यास कुणीही डॉक्‍टर नकार देऊ शकत नाही. कॅन्सर रुग्ण असेल तर त्याचीही स्वॅब तपासणी रोखू नये, ही बाब चुकीची आहे. डॉक्‍टरांनी उपचार नाकारल्याचे रुग्णांनी तक्रार केल्यास हॉस्पिटलवर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.

दररोज 1500 नागरिकांच्या तपासणीची क्षमता
शहरात सुरुवातीला केवळ मेडिकलमध्येच कोरोनासंदर्भातील तपासणी केली जात होती. शासकीय व खासगी लॅबची क्षमता वाढविण्यात आली. आता शहरात 1314 लॅब आहेत. शहरात दररोज 1500 जणांची तपासणी होऊ शकते, एवढी क्षमता आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील डॉक्‍टरांनी पॉझिटिव्ह रुग्ण आल्यास त्यांना दाखल करून घेत उपचार करावे, असेही आयुक्त म्हणाले.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT