Crime Sakal
नागपूर

दोन मुलांसह तुला स्वीकारतो; फक्त माझ्याशी लग्न कर, अन्...

अनिल कांबळे

नागपूर : ‘तुझ्यावर माझे खूप प्रेम आहे... तुला राणी बनवून ठेवेल... अगर तू मेरी नहीं तो मैं तुझे किसी और की भी होणे नहीं दूंगा’ अशी धमकी देत वर्गमित्र असलेल्या युवकाने दोन मुलांची आई असलेल्या मैत्रिणीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी अटक केली आहे. मोनू भास्कर आडीकने (३३, रा. पडोळेनगर, जयभीम चौक) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनू आडीकने हा मनपाच्या गाडीवर सफाई कामगार आहे. कचरा उचलणाऱ्या गाडीवर फिरत असताना लकडगंजमध्ये राहणारी ३० वर्षीय महिला कचरा टाकण्यासाठी बाहेर आली. त्यावेळी त्या महिलेशी त्याची ओळख झाली. ती महिला आणि मोनू पूर्वी एकमेकांचे वर्गमित्र होते. त्याने तिच्याकडे ओळख काढली. तिनेही त्याला ओळखले.

ओळखीतून तो महिलेच्या घरी यायला लागला. महिलेच्या पतीला कॅन्सर झाला असून, तिला तो मदतही करीत होती. तिला दोन मुले असून ती स्वतः शिलाई काम करते. महिलेच्या घरी वारंवार येत असताना त्याचे तिच्यावर एकतर्फी प्रेम जडले. त्याने तिला दोन मुलांसह स्वीकारण्याची तयारी दर्शवीत लग्नाची मागणी घातली. परंतु, महिलेने नकार दिला. तरीही तो तिच्या पाठीमागे हात धुऊन लागला.

१० जुलैपासून तो तिचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत होती. परंतु, ती त्याला दोन मुले आणि पती असल्याचे सांगून समजावण्याचा प्रयत्न करीत होती. २५ सप्टेंबरला तिच्या घरी आला. त्याने तिला पुन्हा लग्नाची मागणी घातली. तिने नकार देऊन घरातून बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे चिडलेल्या मोनूने ‘तू जर माझ्याशी लग्न करणार नसेल, तर तुझाही संसार टिकू देणार नाही. तुलाही कुणाची होऊ देणार नाही’ असे म्हणत स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिली. तसेच मुलाच्याही गळ्याला चाकू लावून ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर महिलेने थेट कपिलनगर पोलिस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT