file photo
file photo 
नागपूर

अधिकाऱ्यांचा "दारू'वाद चव्हाट्यावर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दारूमुळे उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. स्थानिक आणि बाहेरील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गट परस्परांच्या विरोधात उभे ठाकले. परस्परांविरोधात तक्रारींची झळच लागली. वरिष्ठांनी तक्रारीची दखल घेत एक पथक चौकशी करता पाठविले आहे. पथकाने दोन दिवस ठाण मांडून सर्व अधिकाऱ्यांचा जवाब नोंदवून घेतला. 


उत्पादन शुल्क विभागात स्थानिक व बाहेरील अधिकारी, कर्मचारी असे दोन गट निर्माण झालेत. दोन्ही गटांची येथील काही दारूविक्रेत्यांसोबत जवळीक असल्याचे सांगण्यात येते. यातून विक्रेत्यांकडून नियमांचे पालन होत नसतानाही कारवाई होत नसल्याच्या तक्रारी आहेत. तर, विरोधी गटांकडून एकदुसऱ्याच्या संबंधित विक्रेत्यावर कारवाई करण्यात येते. यामुळे दोन्ही गटांतील शीतयुद्ध चव्हाट्यावर आले. काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकमेकांची परस्पर वरिष्ठांकडे केली. यात एकदुसऱ्यावर गंभीर आरोप लावण्यात आले.

अधिकाऱ्यांचे क्षेत्र निश्‍चित आहे. असे असतानाही काही अधिकारी दुसऱ्याच्या क्षेत्रात ढवळाढवळ करीत असल्याची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली. विभागातील स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मोजक्‍याच अधिकाऱ्यांना पाठबळ देण्यात येत असल्याची तक्रार असल्याचे सांगण्यात येते. यातच काही दिवसांपूर्वी एका अधिकाऱ्याकडून दारूविक्रेत्यांवर होणाऱ्या कारवाईचा संदेश लीक झाला.

जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावून शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्तावही उत्पादन शुल्क आयुक्तांकडे पाठविला होता. त्यामुळे विभागातील शीतयुद्ध चव्हाट्यावर आले. आयुक्त कार्यालयाने याची दखल घेत चौकशी करता एक पथक नागपूरला पाठविले. यात नाशिक आणि गडचिरोलीतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बुधवारी दिसवभर त्यांनी सर्व निरीक्षक, दुय्यम निरीक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT