Offline MCQ exam in all universities Uday Samant quality of the exam nagpur sakal
नागपूर

सर्वच विद्यापीठात ‘ऑफलाइन एमसीक्यू’ परीक्षेचा पॅटर्न - उदय सामंत

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये ‘ऑफलाइन एमसीक्यू’ (बहुपर्यायी प्रश्‍न) परीक्षेचा पॅटर्ननुसार परीक्षा घेण्यात येणार

मंगेश गोमासे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये ‘ऑफलाइन एमसीक्यू’ (बहुपर्यायी प्रश्‍न) परीक्षेचा पॅटर्ननुसार परीक्षा घेण्यात येणार आहे. या पॅटर्नला विरोध होत असताना, आता अशाच पॅटर्ननुसार तेराही कृषी विद्यापीठांमध्ये परीक्षा घेण्यात येणार असल्याचे संकेत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे परीक्षेच्या गुणवत्तेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झालेला आहे.

राज्यातील सर्वच विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात असा निर्णय कुलगुरूंच्या बैठकीत झाला. त्यामुळे ही परीक्षा ऑफलाइन (वर्णनात्मक) होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर तब्बत २५ दिवसांनी नागपूर विद्यापीठाने परीक्षेच्या तारखा आणि पद्धतीची घोषणा केली. यामध्ये ऑफलाइन परीक्षा घेण्याचे ठरले. मात्र, त्यात बहुपर्यायी प्रश्‍नपत्रिका देण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या निर्णयावर शिक्षणतज्ज्ञानी टिका केली. त्यानंतर मंगळवारी (ता.२४) गोंडवाना विद्यापीठानेही याच पद्धतीनुसार परीक्षा घेण्याचे ठरविले.

त्यावर आज सकाळी दीक्षान्त कार्यक्रमानंतर उदय सामंत यांना प्रश्‍न विचारला असता, ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतला आहे. याशिवाय ती कशी घ्यावी हाही निर्णय सर्वस्वी कुलगुरूंवर असल्याने त्यावर काही बोलता येणार नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आता सर्वच विद्यापीठांना अशाच प्रकारे परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाल्याने राज्यातील सर्वच विद्यापीठ ‘ऑफलाइन एमसीक्यू’ पॅटर्ननुसार परीक्षा घेतील असे दिसून येत आहे.

अनेकांनी ऑनलाइनसाठी निवेदन दिले. मात्र, कोरोना संपला असल्याने आता केवळ ऑफलाइन परीक्षा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. आता विद्यापीठाच्या कुलगुरूंनी ऑफलाइनचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांनी कोणत्या पद्धतीने ती परीक्षा पार पाडावी ही त्यांची जबाबदारी आहे, त्यात ढवळाढवळ करणार नाही.

- उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT