नागपूर : संचारबंदीमुळे सगळेच घरी आहेत. आपापल्या परीने दिवस घालवित आहे. वेळ घालविण्यासाठी प्रत्येकाने स्वत:चे पर्याय शोधून घेतले. कोणी मुलांसोबत वेळ घालवितो तर कोणी वाचनाचा पर्याय स्वीकारला. गळ्यात गळे घालून फिरणाऱ्या, गर्दीची सवय असलेल्या लोकांना सोशल डिस्टनसिंग कठीण असल्याची जाणीव लवकरच झाली. अशावेळी आठवली जुनी मैत्री, शाळा-कॉलेजातील दोस्त. संपर्क तुटलेल्या जुन्या मित्रांचे फोन नंबर मिळवून संवाद सुरू झाला. त्यामुळे संचारबंदीत दुरावलेली नाती जवळ आली असल्याचे चित्र आहे.
संचारबंदीमुळे प्रत्येकजण घरी आहे. घरी फावल्या वेळात काय करावे हीच प्रत्येकाला चिंता आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून फेसबुकवर चाललेल्या जुन्या फोटोंना कमेंट्स करण्याच्या ट्रेंडचा प्रत्येकाला फायदा झाला आणि कधीकाळी काळाच्या ओघात नजरेआड गेलेले चेहरे पुन्हा दिसू लागले. त्यामुळे नकळत त्यांच्यासोबत घालवलेले ते क्षण, त्या आठवणींनाही उजाळा मिळाला. जगण्याच्या स्पर्धेमुळे ज्यांच्या सहवासाला मुकावे लागले त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी वेळ मिळाला आणि मग निसर्गत:च त्यांच्याशी बोलण्याची प्रत्येकाला इच्छा होऊ लागली. अनेकांनी क्रमांक नसल्याने फेसबुक मॅसेंजरची मदत घेत आप्तस्वकीयांशी संपर्क साधला.
आठवणींना दिला जात आहे उजाळा
शालेय जीवनातले दिवस प्रत्येकालाच आठवत असतात. महाविद्यालयीन जीवनातील अनेक प्रसंग, मित्र आणि आयुष्यातील पहिले प्रेम आठवणींच्या सागरात कुठेतरी सुखरूप असतात. सोशल मीडियाने गेल्या काही वर्षात अशी अनेक नाती जुळवलेली आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्याची संधी आता अनेकांना मिळते आहे. ज्यांनी स्वत:चे अकाउंट गेल्या दोन ते तीन वर्षांपासून उघडूनही बघितलेले नव्हते. त्यांनी ते पुन्हा उघडून बघितलेले आहेत. अनेकांनी तर विनोदीशैलीत कमेंट्सही केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.