ओमिक्रॉन Corona variant ओमिक्रॉन Corona variant
नागपूर

ओमिक्रॉनच्या एका रुग्णापासून १५ जणांना धोका; काय सांगतात तज्ञ

ओमिक्रॉनच्या संक्रमणाचा वेग अधिक

केवल जीवनतारे

नागपूर : ओमिक्रॉन व्हेरियंटचे (Omicron variant) संक्रमण अतिशय गतीने होते. पूर्वीचा व्हेरीयंट एका रुग्णापासून ५ ते ६ जण बाधित होत असत. दुसऱ्या लाटेतील ‘डेल्टा’ या व्हेरियंटने बाधित झालेल्या एका व्यक्तीपासून ९ जणांना लागण होत असे. मात्र, तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असलेल्या ओमिक्रॉनने बाधित झालेला एका रुग्णापासून १५ पेक्षा जास्त लोक बाधित होण्याचा धोका वर्तविण्यात आला आहे. ‘डेल्टा’पेक्षा ओमिक्रॉनचा संक्रमण दर दीड पट (High transmission rate) जास्त (Worse than Delta) असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

ओमिक्रॉनच्या संक्रमणाचा वेग अधिक असल्याने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सॅनिटायझर लावण्यापासून तर मास्कचा वापर करणे ही सवय लावण्याची गरज आहे. विशेष असे की, परदेश वारी करून आलेल्यांसाठी सक्तीचे विलगीकरण हाच पर्याय आहे. याशिवाय लसीकरणावर भर द्यावा असे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या श्वसनरोग विभागप्रमुख डॉ. सुशात मेश्राम म्हणाले.

अलीकडे अनेकांचे ‘मास्क’ हनुवटीवर आले आहेत. यामुळे पुन्हा एकदा धोक्याची घंटा आहे. सध्या ओमिक्रॉनचा धोका आहेच, ही बाब लक्षात ठेवत या व्हेरियंटला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. या व्हेरीयंट हल्ला होऊ नये म्हणून प्रत्येकालाच दक्ष राहण्याची गरज आहे. दक्षिण आफ्रिकेतून ओमिक्रॉन आला असून संक्रमण जलदगतीने वाढले आहे. आपली लोकसंख्या लक्षात घेता त्या तुलनेत येथील गती अधिक असेल. यामुळे गर्दीत मिसळण्यापासून, समारंभ टाळावेत, वारंवार हात धुवावे असा सल्ला डॉ. सुशात मेश्राम यांनी दिला.

हे पाळा

  • पहिल्या व दुसऱ्या लाटेचे अनुभव घेत पुढील काळात दक्ष असा

  • प्रत्येकाने मास्क घालून स्वतःचा व दुसऱ्याचा बचाव करावा

  • कोरोना नियंत्रणासाठी जे नियम लावण्यात येतील ते पाळले जाणे आवश्यक आहे.

  • गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, हे स्वतःसह इतरांना सांगावे

ओमिक्रॉनचा रुग्ण आपल्याकडे आढळलेला नाही. यामुळे याबाबत अद्याप कोणतेही विधान करता येणार नाही. दक्षिण आफ्रिकेसारख्या देशातील तज्ज्ञांच्या मतानुसार लसीकरण झालेल्या रुग्णांत या व्हेरीयंटची तीव्रता कमी आहे. व्हेरीयंट नवीन असल्याने यावर अभ्यासातून संशोधनाची गरज आहे. ओमिक्रॉन व्हेरीयंटचे जागतिक आरोग्य संघटनेने नामकरण (बी.१.१.५२९) असे केले आहे.
- डॉ. सुशांत मेश्राम, प्राध्यापक, श्वसनरोग विभाग, सुपर स्पेशालिटी, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT