One dies in two-wheeler accident in Nagpur
One dies in two-wheeler accident in Nagpur 
नागपूर

Video : 'तो' हेल्मेट न घालताच भरधाव निघाला अन्‌ दुसऱ्या दुचाकीला धडकला, मग...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : वाहन जोरात चालवल्याने अपघातात होतात. त्यामुळे वाहन हळू चालवा असे आवाहन केले जाते. तसेच वाहन चालवताना हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले जाते. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येते. मात्र, याचा पाहिजे त्या प्रमाणात फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे. अशाच एका अपघातात सोमवारी युवकाला आपला जीव गमवावा लागला. रचित मदने असे मृताचे नाव आहे. 

रचित मदने हा सोमवारी सकाळी नागपुरातील रामकुलर चौकातून दुचाकीने भरधाव जात असता. रस्ताच्या पलीकडे जाण्यासाठी दुसरा युवक मोपेड वाहनाने निघाला. मात्र, रस्त्याच्या मधोमध दोन्ही वाहन एकमेकांना धडकले. या धडकेत दोन्ही वाहन चालक रस्त्यावर कोसळले. मात्र, दुचाकीस्वार मदने वेगात असल्याने गाडीसह दूर फेकला गेला. तो गाडीवरून कोसळून रस्तादुभाजकावर असलेल्या विद्युत खांबावर जाऊन धडकला. 

मदने याचे डोक सरळ विद्युत खांबाला जाऊन धडकल्यामुळे घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे दोन्ही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले नव्हते. रचित मदनेने हेल्मेट घातले असते तर त्याचा जीव वाचला असता, अशी चर्चा परिसरातील नागरिक करीत होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 

जनजागृती पडतेय कमी!

वेगाने गाडी चालवणे, हेल्मेटचा वापर न करणे यामुळे रोज अपघात होत आहेत. याला आळा घालण्यासाठी वाहतुकीचे नियमही कडक करण्यात आले आहेत. तरीही अपघाताची संख्या काही कमी होताना दिसत नाही. तसेच वाहनधारकांकडूनही नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. वाहतुकीच्या नियमांबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असूनही ती कमी पडतेय की काय अशीच शंका अशा घटनांवरून निर्माण होत आहे. 

हेल्मेट घालण्यास टाळाटाळ

दुचाकीस्वार हेल्मेट न घालण्याचे नुसते कारण शोधत असतात. हेल्मेटपासून कशी सुटका मिळेल याच्याच प्रयत्नात ते असतात. हेल्मेट घातल्याने कमी अयकायला येते, केस खराब होतात, आजूबाजूचे दिसत नाही, माण दुखते अशी अनेक कारणे सांगून हेल्मेट घालण्याचे युवक टाळत असतात. हीच कारणे त्यांचा जीव घेत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT