One hundred satellites will be launched on February seven 
नागपूर

इवलेसे उपग्रह सांगणार अंतराळातील गुपिते; हेलियम बलूनद्वारे ४० हजार मीटर उंचीवर सोडणार

मंगेश गोमासे

नागपूर : तामिळनाडू राज्यातील रामेश्वर येथे देशभरातील एक हजार विद्यार्थी शंभर उपग्रह तयार बनवीत आहे. ते उपग्रह अंतराळात सात फेब्रुवारीला सोडण्यात येणार आहे. ५० ते ८० ग्रॅमचा एक उपग्रह अंतराळात घडणाऱ्या प्रत्येक माहिती टिपणार आहेत. विशेष म्हणजे हेलियम बलूनने ते अवकाशात सोडण्यात येणार आहे. या उपक्रमात नागपूरच्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेतील दोन मुलींचा समावेश आहे.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन जागतिक रेकॉर्डसाठी प्रयत्न करीत आहे. यात देशभरातून शालेय व महाविद्यालयीन युवकांची निवड केली जात आहे. शालेय जीवनात अंतराळ तंत्रज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करून भविष्यात स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये विद्यार्थ्यांचे योगदान वाढावे यासाठी हा उपक्रम आहे.

यात जगातील सर्वात कमी वजनाचे १०० उपग्रह बनवून ७ फेब्रुवारी रोजी ४० हजार मीटर उंचीवर सोडण्यात येणार आहे. सेंसर असलेले हे उपग्रह प्रत्यक्ष वातावरणाची माहिती घेऊन पृथ्वीवरील केंद्राला पाठवतील. यामध्ये प्रामुख्याने मॅपिंग, हवामान, त्यातील वायू आणि पुंज (क्वॉंटम) यांचा समावेश आहे. यासाठी काजल शर्मा आणि स्वाती मिश्रा यासाठी जोरात तयारी करीत आहेत.

१८ ते २२ दरम्यान नागपूर किंवा पुणे येथे ऑफलाइन प्रशिक्षण होणार आहे. यात उपग्रह बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सोबतच ते बनविण्यासाठी आवश्यक असलेली कीट सुद्धा दिली जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी विज्ञान शिक्षिका दिप्ती बिष्ट यांनी विशेष प्रयत्न घेतले आहे. त्यातून आज विद्यार्थिनींना जागतिक दर्जा मिळविता येणे शक्य झाले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वयोमर्यादा वाढवली, गांजा प्रकरणात दोषी असलेल्यांनाही प्रवेश मिळणार अन्...; सैन्यात भरतीचे नियम बदलले, कुणी घेतला निर्णय?

तू I Love You म्हणाली नाहीस? प्राध्यापकाने भरवर्गात केलं प्रपोज, वाटायला चॉकलेट्सही आणली; विद्यार्थीनीने...

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

"तेव्हा माझ्यातला नवरा पुढे आला" उमेशने शेयर केला पुन्हा प्रियासोबत नव्या वेबसिरीजमध्ये काम करण्याचा अनुभव

Numerology : 'या' 3 महिन्यात जन्मलेली व्यक्ती असते सगळ्यांची लाडकी; एका इशाऱ्यावर लोक त्यांच्यासाठी काहीही करतात

SCROLL FOR NEXT