Chikungunya and Dengue disease sakal
नागपूर

Chikungunya Disease : तीन पैकी एका रुग्णास चिकनगुनिया आर्थरायटिसचा धोका : आरोग्यतज्ज्ञांचे निरीक्षण

Chikungunya : चिकनगुनियानंतर तीनपैकी एका रुग्णास चिकनगुनिया आर्थरायटिस होण्याचा धोका असतो. स्नायू व सांधेदुखीची लक्षणे दीर्घकाळ राहतात, त्यामुळे वेळेत संधिवात तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : चिकनगुनिया होऊन गेल्यावर देखील चार आठवडे ते चोवीस आठवड्यांपर्यंत रुग्णांमध्ये सांधेदुखी आढळून येत आहे. अशा प्रकारच्या सांधेदुखीला ‘चिकनगुनिया आर्थरायटिस’ असे वैद्यकीय भाषेत संबोधण्यात येते.

तीन पैकी एका चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये चिकनगुनिया आर्थरायटिस आढळून येतो, असे एका अभ्यासातून पुढे आले आहे. त्यामुळे चिकनगुनियानंतर दीर्घकाळ अंगदुखी व सांधेदुखी असल्यास तातडीने संधीवात तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे निरीक्षण रुम्हॅटोलॉजिस्ट अर्थात संधिवात तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

जिल्ह्यात प्रत्येक घरात चिकनगुनियाचे रुग्ण आढळत आहे. नागपूर शहरात सुमारे एक हजारावर रुग्णांची नोंद झाली. मात्र नोंदीशिवाय राहिलेल्या रुग्णांची संख्या हजारोंच्या घरात आहे. चिकनगुनियावर नियंत्रण मिळविल्यानंतरही या रुग्णांना उठताबसता किंवा चालताना असह्य वेदना होतात. प्रामुख्याने मनगट, गुडघा व अगदी बोटांच्या सांध्यांमध्ये वेदना होतात.

चिकनगुनियाच्या तापातून बरा झाला असल्याने ही सांधेदुखी आता आपोआप बरी होईल म्हणून अंगावर दुखणे काढण्यात येते. मात्र हा विकार अधिक बळावत जातो. उपचार केले नाहीत, तर वेदना अधिक वाढून चिकन गुनिया आर्थरायटिस होऊ शकतो, असे संधीवात रोग तज्ज्ञ डॉ. तन्मय गांघी म्हणाले.

आजाराची लक्षणे

  • सांध्यात तीव्र वेदना

  • बोटांचे सांधे दुखणे

  • सकाळी सांधे अकडणे

  • तीव्र अशक्तपणा

  • ताप व सांधे तापणे

  • स्नायूंच्या वेदना

  • शरीरावर रॅश येणे

चिकनगुनियानंतर होणाऱ्या सांधेदुखीकडे दुर्लक्ष करू नये. काही कालावधीनंतर याचे विपरीत परिणाम जाणवण्याचा मोठा धोका आहे. वेळेत उपचार केले नाहीत, तर चिकनगुनिया आर्थरायटिस दुखणे दीर्घकाळ होऊ शकते. यामुळे वेळेत उपचार करवून घेतले, तर औषधोपचाराने दुखणे पूर्ण नियंत्रणात येते.

-डॉ. तन्मय गांधी, संधिवात तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT