नागपूर

नागपूर महापालिका करणार नागरिकांच्या आरोग्यावर केवळ २ टक्के खर्च

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना काळात (Nagpur corona) महापालिकेच्या (Nagpur NMC) आरोग्य यंत्रणेचे पितळ उघडे पडल्यानंतर यंदा त्यात सुधारणेसोबतच विस्तारासाठी स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी ५५ कोटींची तरतूद केली. त्यांनी आज सभागृहात २०२०-२१ या वर्षासाठी २ हजार ७९६ कोटींचा अर्थसंकल्प (Financial Budget Nagpur NMC) सादर केला. या वर्षाचा २ हजार ७९५ कोटींचा होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत आरोग्यावर केवळ दोन टक्के रक्कम खर्च करण्याचे भोयर यांनी प्रस्तावित केले. आरोग्यावरील तरतूद पाहता शहरातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यावर फक्त १८३ रूपये खर्च करण्यात येणार आहेत. (only 2 percent budget for health in financial budget of Nagpur nmc)

महापालिकेची विशेष सभा आज ऑनलाइन पद्धतीने पार पडली. स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी आज २ हजार ७९६ कोटींचा अर्थसंकल्प महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे सादर केला. सभागृहात अर्थसंकल्प सादर केल्यानंतर भोयर यांनी २०२०-२१ या वर्षासाठी प्रस्तावित केलेल्या योजनांचा पेटारा उघडला.

नागपूरकरांच्या आरोग्यासाठी भरघोस तरतुदीची अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यांनी मागील वर्षीच्या तुलनेत यात वाढही केली. परंतु कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगासाठी ही वाढ तोकडी ठरण्याची शक्यता आहे. मागील वर्षी ही रक्कम ३० कोटी होती. अर्थात दरडोई १०० रुपये आरोग्यावर खर्चाचे प्रस्तावित केले होते. यात त्यांनी १ हजार ऑक्सिजन सिलिंडर खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगितले. यासाठी त्यांनी २ कोटींची तरतूद केली. यासाठी तातडीने निविदा काढण्यात येणार असल्याचे ते भाषणात म्हणाले.

आरोग्य सेवेसाठी मानधनावर मनुष्यबळ नियुक्तीच्या सूचनाही त्यांनी यावेळी केली. कोरोना काळात अंत्यसंस्कारासाठी जागा कमी पडल्याने दहनघाटांच्या विकास व विस्तारासाठी त्यांनी साडेसात कोटींची तरतूद केली. नागरिकांना मोतीबिंदूचे निःशुल्क ऑपरेशन राज्य सरकारच्या विविध योजनेतून तर तिरळेपणा दूर करण्यासाठी मोफत उपचार देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय गरीब नागरिकांसाठी महापौर जीवनावश्यक औषधी मेडिकल बॅंक सुरू करण्यात येणार आहे. यासाठी सामाजिक संस्था, व्यापारी, उद्योजकांची मदत घेतली जाणार आहे. याशिवाय कोरोना काळात आई विलगीकरणात असली तर तिच्या बाळाच्या दूधाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे आता पाचपावली सुतिकागृहात दूध बॅंक सुरू करण्याचा मानस भोयर यांनी व्यक्त केला. सिकलसेलग्रस्तांसाठी केंद्र सरकारच्या मदतीने डे केअर व संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. येथे सर्व सुविधा मोफत राहतील, असे ते म्हणाले.

व्हॅक्सिन खरेदीसाठी १० कोटी

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत महापौर दयाशंकर तिवारी यांनी आरोग्यासाठी तरतूद करण्यात आलेल्या ५५ कोटींमधूनच १० कोटी रुपये कोरोना व्हॅक्सिन खरेदीसाठी ठेवण्यात आल्याचे सांगितले. याशिवाय नगरसेवक, आमदारांकडूनही निधी मिळणार असल्याने ही रक्कम ३० कोटीपर्यंत जाईल. त्यामुळे व्हॅक्सिन खरेदीला बळ मिळणार असल्याचे ते म्हणाले.

(only 2 percent budget for health in financial budget of Nagpur nmc)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT