नागपूर

नशिब बलवत्तर; तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊनही रुग्ण बचावला

केवल जीवनतारे

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्याालय व रुग्णालयातील (मेडिकल) वाॅर्ड क्रमांक १७ मध्ये दाखल असलेल्या रुग्णाने सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास तिसऱ्या माळ्यावरून उडी घेतली. उडी घेतल्यानतंरही त्याला कोणताही इजा झाली नाही, असा दावा करण्यात येत आहे. या रुग्णाला मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. नूर रोषण शेख (६५) असे रुग्णाचे नाव आहे.

सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास तिसऱ्या माळ्यावरून पडल्यावरही रुग्णाच्या पाठीच्या मणक्यात किरकोळ फॅक्चर झाले. फारसी गंभीर इजा नसल्याचे सांगण्यात येते. तिसऱ्या माळ्यावरून पडल्यानंतरही इजा न झाल्यामळे डॉक्टरही थक्क आहे. नूर हा नागपूर शहराच्या बाहेरचा रुग्ण आहे. सुमारे तीन दिवसांपूर्वी त्याने अतिमद्य प्राशन करून विहरीत उडी मारली होती. त्यामुळे त्याला उपचारासाठी मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक १७ मध्ये दाखल करण्यात आले होते.

त्याला मानसिक आजारही असल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला होता. रुग्णावर उपचार सुरू असतानाच ९ ऑगस्टच्या रात्री तो तिसऱ्या माळ्यावरील वॉर्डाच्या बाहेरील पोर्चमध्ये फिरत होता. अचानक त्याने सुरक्षा भिंतीवर चढून उडी मारली. हा प्रकार बघून तेथील उपस्थितांमध्ये खळबळ उडाली. तातडीने वरिष्ठांना सूचना दिली. वैद्यकीय अधीक्ष डॉ. अविनाश गावंडे तत्काळ घटनास्थळी हजर झाले. त्याला ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल केले. विविध तपासणीत त्याला पाठीच्या मनण्यात किरकोळ फॅक्चर निघाले.

सुपरस्पेशालिटीतील १५ मे ची घटना

सुपरस्पेशालिटीत १५ मे २०२१ रोजी तिसऱ्या माळ्यावरून पडून रुग्णाचा मृत्यू झाला होता. सिरसपेठेतील तुळशीराम पांडुरंग बागडे (६८) असे त्या रुग्णाचे नाव होते. या पूर्वी देखील एका रुग्णाने मेडिकलमध्ये भिंतीवर बसलेला एक रुग्ण चार महिन्यांपूर्वी पडला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT