cattles
cattles google
नागपूर

नागपुरात मोकाट जनावरांचा हैदोस, वाहनचालकांमध्ये भीती

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहराची लोकसंख्या तीस लाखांच्या (nagpur population) आपसपास आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येमुळे रस्त्यांवर गर्दी होत असताना त्यात आता मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचीही भर पडली आहे. कधी कुठले जनावर वाहनाला आडवे येईल हे सांगता येत नाही. यामुळे दररोज कुठे ना कुठे अपघातांच्या (accident) घटना घडत असतात. मध्य नागपुरात तर मोकाट जनावरांचा हैदोस धडकी भरविणारा असतो. (people facing problems due to animals on road in nagpur)

रस्त्यावरील मोकाट जनावरांचा मुक्त संचारामुळे सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत. मध्य नागपुरातील अनेक भागांमध्ये मोकाट जनावरांचा हैदोस धडकी भरविणारा ठरला असून नागरिकांमध्ये चांगलीच धास्ती व्याप्त आहे. शहरात असलेले आठवडी आणि दररोज भरणाऱ्या भाजीबाजार आणि फळांच्या दुकानाच्या आसपास विक्रेते, दुकानदार उरलेला भाजीपाला टाकून देतात. एकाचवेळी १५-२० गायी, म्हशी फेकलेल्या भाजीपाल्यांवर तुडून पडतात. कधी कधी तर दुकानात मांडलेला भाजीपालाही ओढून नेतात. कॉटन मार्केट भागात तर रात्रंदिवस जनावरे समूहाने रस्त्यावर उभी असतात. मेट्रोसह अन्य कामामुळे या भागातील रस्ता पूर्वीच अरूंद झाला आहे. त्यात फळविक्रेत्यांचे ठेले रस्त्यापर्यंत असतात. जनावरांना हाकलल्यास ते सैरावैर धावतात. परिणामी अपघाताची दाट शक्यता असते.

इथे भेटतात मोकाट गुरांचे समूह -

कॉटन मार्केट, गोळीबार चौक, पाचपावली-दहिबाजार पूल, नाईक तलाव, राऊत चौक, बांगलादेश, बंगाली पंजा

मुले, बालकांना धोका -

मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बालके आणि मुलांना सर्वाधिक धोका असतो. झुंडीने फिरणाऱ्या जनावरांच्या पायाखाली तुडविले जाण्याचा धोका असतो. त्यामुळे लहान मुलांना एकटे सोडण्यास पालक घाबरतात.

कुत्रेही उदंड -

तिनल चौक, मोमीनपुरा, पाचपावली पूलाखाली मटन मार्केट आहे. याठिकाणी कुत्र्यांची संख्या धडकी भरवणारी असते. कधी २०-२५ कुत्री एकत्र दिसतात. अचानक ही कुत्री कुणाच्याही अंगावर धावून जातात. वारंवार तक्रार केली जाते. पण, कुणीच दखल घेत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

...तर अधिकाऱ्यांवरच व्हावी कारवाई -

मोकाट जनावरांना आवर घालण्याची सर्वस्वी जबाबदारी महापालिकेची आहे. त्यासाठी अधिकारी आणि यंत्रणा नियुक्त असून मोठा खर्च होतो. परंतु, हे पथक कुठेही दिसत नाही. त्यांचा कामचुकारपणाच समस्येचे मुख्य कारण आहे. यामुळे मोकाट जनावरे दिसत असतील संबंधित अधिकाऱ्यांवरच कारवाई व्हावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

जनावरांची संख्या -

  • मोकाट कुत्री - लाखाच्यावर

  • गायी, सांड - ५० हजार

इतवारी भागात मोकाट जनावरांची संख्या फारच गंभीर झाली आहे. अपघाताची शक्यता चांगलीच बळावली आहे. दरवर्षीच पावसाळ्यात ही समस्या तीव्रतेने जाणवते. कुत्र्यांची संख्याही चांगलीच वाढली आहे. कुत्री अंगावर धावत असल्याने संकीर्ण रस्त्याने एकटे जाताना नेहमीच मनात भीती असते.
-राहुल पानवलकर, इतवारी.
दहीबाजार, जुने सतरंजीपुरा झोन कार्यालय, तांडापेठ, गांजाखेत या भागात गायी समूहाने रस्त्यावरच ठाण मांडून असतात. यामुळे जीव मुठीत धरूनच वाहन चालवावे लागते. अनेक वर्षांची समस्या असूनही कुणी लक्ष देत नाही, ही शोकांतीकाच आहे.
-निखील सावरकर, लाडपुरा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT