phaco machines are closed in operation theater of government medical college nagpur
phaco machines are closed in operation theater of government medical college nagpur 
नागपूर

नेत्र विभागाला लागली नजर! मेडिकलच्या शस्त्रक्रियागारातील तीनही फेको यंत्र बंद

केवल जीवनतारे

नागपूर : मेडिकलमध्ये विदर्भातूनच नव्हे तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेशासह सीमेलगतच्या तेलंगणातूनही येथे उपचाराला येतात. मात्र, मागील तीन महिन्यांपासून मेडिकलच्या नेत्ररोग विभागावर अवकळा पसरली असून येथील शस्त्रक्रियागारातील सर्व फेको यंत्र बंद पडले आहेत. 

शरीराचा सर्वात महत्त्वाचे इंद्रिय म्हणजे डोळे. अलीकडे संगणक, मोबाईलमुळे नेत्ररोगांत वाढ झाली. यातही गरीबांच्या डोळ्यांचा जंतूसंसर्ग असो की, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया, मेडिकलशिवाय पर्याय नाही. येथील बाह्यरुग्ण विभागात दर दिवसाला ३०० नेत्ररुग्णांची नोंद होते, तर दिवसाला २५ रुग्णांच्या नेत्रांवर शस्त्रक्रिया होतात. दरवर्षी मोतिबिंदुच्या सुमारे पाच हजारावर शस्त्रक्रिया होतात. शंभरपेक्षा अधिक रुग्णांच्या डोळ्यांत उजेड पेरणाऱ्या बुबुळ प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होतात. नेत्रसेवा करणाऱ्या मेडिकलमधील नेत्र विभागाला नजर लागली असून येथील फेको यंत्र बंद पडली आहेत. मात्र, मेडिकल प्रशासनाने याची दखलच अद्याप घेतली नाही. विभागातील यंत्रसामग्रीच्या देखभालीसाठी दरवर्षी 'एएमसी' आणि 'सीएमसी' (वार्षिक देखभाल ) केली जाते. यासाठी शासनाकडून आर्थिक तरतूद केली जाते. मात्र, कोरोनामुळे गतवर्षी देखभालीसाठी निधी मिळालाच नाही. यामुळे मेडिकलमधील अत्याधुनिक अशा फेको मशीन बंद पडून आहेत. मेडिकलमधील हे यंत्र आणखी काही दिवस हे यंत्र बंद राहिल्यास निकामी होण्याची भीती व्यक्त केली आहे. मेडिकलमध्ये मोतिबिंदूच्या मागील पाच वर्षांत सुमारे २० हजारावर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. साडेचारशेपेक्षा अधिक रुग्णांच्या डोळ्यात बुबुळ प्रत्यारोपण करण्यात आले. 

फेको यंत्र - 
फेको तंत्राचा वापर करून मोतीबिंदू शस्त्रक्रिया करताना डोळ्याला कमीत कमी इजा होते. रुग्णाच्या डोळ्यातली जखम लवकर भरून निघते. डोळ्यांना जास्त इजा होत नसल्याने रुग्ण मानसिक तणावाखाली येत नाही, शस्त्रक्रियेनंतर डोळा कोरडा पडण्याची शक्यताही कमी होते. मेडिकलमधील फेको यंत्र बंद असल्याच्या वृत्ताला वरिष्ठ डॉक्टरांकडून दुजोरा मिळाला आहे. 

खासगीतील उपचार गरिबांच्या आवाक्यात नाहीत. मेडिकलमध्ये फेको यंत्र बंद आहेत. यंत्राच्या 'एएमसी' आणि 'सीएससी' न झाल्याने बंद यंत्रावरील उपचार थांबले. वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री अमित देशमुख यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार करण्यात येईल. 
-त्रिशरण सहारे, अध्यक्ष, विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय आरोग्य कर्मचारी संघटना, नागपूर. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT