Plasma therapy does not treat patients In Medical-Meyo
Plasma therapy does not treat patients In Medical-Meyo 
नागपूर

दान मिळालेला ‘प्लाझ्मा’ वाढवतोय मेयो-मेडिकलची शान

केवल जीवनतारे

नागपूर : कोरोनाच्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. आजारातून मुक्त झालेल्यांचीसंख्याही त्या तुलनेत कमी नाही. अशा वेळी अत्यवस्थ कोरोनाबाधितांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा पर्याय राज्यभरात उपलब्ध झाला आहे. कोरोनाच्या ज्या रुग्णांना ऑक्‍सिजन आणि अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करावे लागते, अशा गंभीर कोरोनाबाधितांवर ‘प्लाझ्मा’ थेरपीचा उपयोग करावा असे संकेत आहेत. तशी ही थेरपी वरदान ठरली आहे, असे प्रयोगातून सिद्ध झाले. यामुळेच राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत प्लाझ्मा थेरपी युनिट तयार झाले. मात्र उपराजधानीत तयार झालेल्या युनिटमध्ये दान मिळालेला ‘प्लाझ्मा’ वापर करण्यात आला नाही. तर केवळ मेडिकल-मेयोच्या रक्तपेढीची शान वाढवत असल्याचा भास होतो आहे. प्लाझ्मा थेरपीचा वापरात येथील डॉक्टरांनाच रस नसल्याचे दिसून येत आहे. 

कोरोनाच्या प्राणघातक आजारामधून सरकारी आणि खासगी उपचार घेऊन बरे झालेल्या सर्व रुग्णांना प्लाझ्मा थेरपीसाठी प्लाझ्मा दान करणे बंधनकारक करावे, असा सूर सुरू आहे. प्लझ्मा दानकर्त्यांशी संपर्क साधून प्लाझ्माचे दान मिवळवण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील संबधित प्लाझ्मा युनिटमधील प्रमुखांनी प्रयत्न करावे असे वैद्यकीय संचालक कार्यालयातून सांगण्यात येते. मेडिकलमध्ये सद्या १८ युनिट तर मेयोत ११ युनिट प्लाझ्मा कोरोनाबाधित रुग्‍णांवरील वापरासाठी तयार आहे. नागपूरच्या मेडिकलमध्ये अमरावती येथील एका डॉक्टरवर वापर करण्यात आला. मात्र त्यानंतर एकाही रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला नाही. हा वापर का होत नाही, हा मेयोमेडिकलसाठी संशोधनाचा विषय बनला आहे. प्लाझ्मा दान करण्यासाठी दाते पुढे येताना दिसत आहेत. मेडिकल आणि मेयोत २८ युनिट प्लाझ्मा दानातून मिळाला आहे. येवढच नव्हेतर नागपुरात मेयो रुग्णालयात एका व्यक्तीने एक नाही तर दोन वेळा सामाजिक बांधिलकीतून त्यांनी प्लाझ्मा दान केला. यासंदर्भात मेयो, मेडिकल प्रशासनाशी संपर्क साधला, परंतु त्यांनी चुप्पी साधली. 

४ हजारांपैकी केवळ १४ जण दानकर्ते 

नागपूर जिल्ह्यात मेयो, मेडिकल आणि एम्स मधून सुमारे ४ हजार कोरोनाबाधितांनी कोरोनाला हरवले. हे चार हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले. मात्र चार हजार कोरोनामुक्तांपैकी केवळ केवळ १४ व्यक्तींनी प्लाझ्मा दान केला. यातील एकाचा प्लाझ्मा तेवढा वापर झाला. उर्वरित २७ युनिट प्लाझ्मा मेडिकल, मेयोच्या रक्तपेढीत केवळ शान म्हणून ठेवला आहे. त्याचा वापर झाला नाही. विशेष असे की, 
कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून 28 दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कोणताही रुग्ण प्लाझ्मा दान करू शकतो. एका वेळेस एक रुग्ण 400 मिलि प्लाझ्मा दान करू शकतो. 15 दिवसांच्या अंतराने 2-3 वेळेसही प्लाझ्मा दान करू शकतो. प्लाझ्मा दान केल्याने रुग्णाला कोणताही त्रास होत नाही. मात्र, कोरोनामुक्त झाल्यानंतर चार महिन्यांपर्यंत प्लाझ्मा दान करता येते. 


मृत्यूदर वाढूनही का होत नाही वापर 

एकिकडे कोरोनावर मात करणाऱ्या व्यक्तींकडून प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रवृत्त करावे असे वैद्यकीय संचालनालयातून व्हिडिओ कॉन्फरंस्निंगद्वारे संबधितांना सांगण्यात येत आहे. प्लाझ्मा दान करणे हे सामाजिक बांधिलकी जपली जाते. मात्र नागपुरात पाच पट मृत्यू वाढल्यानंतरही प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात नाही. २१५ मृत्यू झाल्यानंतरही या गंभीर रुग्णांवर मेयो मेडिकलमध्ये प्लझ्माचा वापर झाला नाही, यावरून येथील प्लाझ्मा थेरपीला फिजिशियन यांच्याकडून बगल देण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT