नागपूर : जगातील १८ टक्के लोकसंख्या एकट्या भारतात राहते. त्यामुळे भारतीयांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या संशोधनावर शास्त्रज्ञांनी भर द्यायला हवा. याचा प्रभाव संपूर्ण मानवतेवर होईल, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित १०८ व्या भारतीय विज्ञान कॉंग्रेसमध्ये ते बोलत होते.
यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचे जितेंद्र सिंह, आयएससीच्या अध्यक्षा विजयालक्ष्मी सक्सेना, कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी आदी उपस्थित होते.
यंदाच्या विज्ञान कॉंग्रेसची ध्येय वाक्य हे 'शास्वत विकास आणि महिला सक्षमिकरणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान' असे आहे. पुढील २५ वर्षातील भारताच्या यशात वैज्ञानिक समुदायाचा महत्त्वपूर्ण वाटा असेल, असे मत मोदी यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले,"एकविसाव्या शतकातील भारतात डेटा आणि तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून, यामुळे भारतीय विज्ञान एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले जाई. पारंपारिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान वैज्ञानिक शोधासाठी महत्त्वपूर्ण ठरत असून, आजचा भारात वैज्ञानिक दृष्टीकोण घेऊन पुढे जात आहे."
केवळ विज्ञानातूनन महिला सक्षमिकरण नाही तर महिलांच्या सहभागातून विज्ञानाचे सक्षमीकरण करूयात, अशी भूमिका मोदींनी मांडली. फडणवीस म्हणाले,"महिला सक्षमिकरण आणि लिंगसमानतेसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची आहे.
शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी विज्ञान महत्त्वाचे आहे. हवमान बदलामुळे कृषी क्षेत्राबरबोरच संपुर्ण मानवजातीसमोर मोठे संकट आहे. त्यामुळे शाश्वत विकासाचे धोरण अनिवार्य झाले आहे. मानवाने स्वतःच्या उपयोगासाठी गरजे एवढीच संसाधणे वापरायला हवी."
डॉ. जितेंद्र सिंह,``देशातील जनमानसात योग्यता, क्षमता आणि कष्ट करण्याची ताकद आहे. फक्त कमी होती ती वातावरणाची. मोदींच्या नेतृत्वात ते निर्माण करण्यात आले आहे. आपली आजची सर्व आव्हाने ही वैश्विक आहेत.
जागतिक तापमान वाढ, हवामान बदल, सायबर सुरक्षा सारखे व हे जागतिक दर्जाची आहे. शाश्वत संशोधन, स्टार्टअप अनिवार्य आहे. संशोधन, शैक्षणिक संस्था आणि उद्योगांचे परस्पर सहकार्य गरजेचे आहे."
गडकरी म्हणाले,"प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारत आणि पाच ट्रीलीयन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे ध्येय आपल्यासमोर ठेवले आहे. त्यासाठी कृषी आणि ग्रामिण अर्थव्यवस्थेवा महत्वपूर्ण भूमिका बजावेल. गाव, गरीब, कामगार यांच्या विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान गरजेचे आहे.
यातून विकासाचे नवे आयाम साधायले जातील. स्थानिक स्तरावरील संशोधन, आर्थिक विकासाठी विज्ञान आवश्यक आहे. कृषी आणि ग्रामउद्योगासाठी भविष्यकालीन विज्ञान तंत्रज्ञान गरजेचे आहे."एकनाथ शिंदे म्हणाल, "अंधश्रद्धा निर्मूलनापासून ते सामाजिक विवेक जागृतीचे कार्य तुकडोजी महाराजांनी केले.
त्यांच्या नावाने सन्मानित झालेल्या विद्यापीठात भारतीय विज्ञान कॉंग्रेस साजरी होत आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आता महिलांची भागिदारी वाढत आहे. कृषी विज्ञान, अवकाश, वैद्यक, पदार्थविज्ञान आदी क्षेत्रात अनेक महिलांनी लक्षणीय शोधकार्य केले असून, त्यामुळे येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळत आहे.
देशाच्या विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे संशोधन आणि विकासासाठी अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असून, युवा पिढीने डॉक्टर आणि अभियांत्रिकीच्या पुढे जात संशोधक बनायला हवे.
नवतंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांसह दूर्गम खेड्यातील आदिवासींच्या जीवनात अमुलाग्र बदल घडत आहे." विजया लक्ष्मीसक्सेना यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले
- भारत सध्या क्वांटम कंप्युटींग, रसायने आणि पदार्थ विज्ञानावर भर देत असून, भारतीय युवकांनी क्वांटम तंत्रज्ञानवरील संशोधनात सहभाग नोंदवावा
- देश सध्या सेमिकंडक्टर चीपसाठी प्रयत्न करत असून, आत्ताच सेमिकंडक्टर उद्योगातील भविष्यकालीन आव्हानांसाठी आपण सज्ज असायला हवे, असे झाले तर भारत इंडस्ट्री ४.० चे नेतृत्त्व करु शकेल.
- व्यवहारिक स्तरावर शाश्वत विकास आणि महिला सक्षमिकरण एकमेकांशी जोडले आहे. केवळ विज्ञानाच्या माध्यमातून महिला सक्षमिकरण करून चालणार नाही, तर महिलांच्या सहभागातून विज्ञानाचे सक्षमिकरण करात येईल.
- शास्रज्ञांच्या ज्ञानाला व्यवहारिक उपयोजितता मिळाली की लोकांचे जगणं सुसह्य होतं. म्हणून प्रयोगशाळेतील विज्ञान प्रत्यक्ष जमिनीवर उतरायला हवे.
- मानवतेवर सध्या वैश्विक साथींचे संकच असून भारतही लसीच्या संशोधन आणि विकासाला चालणा देत आहे. आजारांचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या मंत्रालयांनी सोबत काम करायला हवे.
- स्टार्टअप्सने शैक्षणिक संस्था आणि उद्योगांचे सहकार्य घ्यायला हवे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.