Nagpur Administrative sakal
नागपूर

POP Ban : बंदीचा फज्जा! पीओपी मूर्तींची सर्रास विक्री, नागपूर प्रशासनाने केल्या तब्बल ३५ मुर्त्या जप्त

नागपूर शहरात पीओपी मूर्ती विक्रीवरील बंदीचा फज्जा उडाल्याचे आज गणेश चतुर्थीच्या दिवशीही अधोरेखित झाले.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - शहरात पीओपी मूर्ती विक्रीवरील बंदीचा फज्जा उडाल्याचे आज गणेश चतुर्थीच्या दिवशीही अधोरेखित झाले. नागरिकांनीही पीओपी मूर्ती खरेदीला पसंती दिल्याने विक्रेत्यांचेही चांगलेच फावले. विशेष म्हणजे आज शेवटच्या दिवशीही महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने कारवाई करीत ३५ मुर्त्या जप्त केल्या.

महापालिकेने आठवड्याभरापासून पीओपी मूर्ती विक्रेत्यांविरोधात मोहीम उघडली होती. पोलिसांच्या सहकार्याने गोदामावर तसेच विक्रेत्यांवरही छापे घातले. हजारावर मूर्ती जप्त केल्या. परंतु साडेसहा लाख घरे असलेल्या शहरात महापालिकेची ही कारवाईही तोकडी पडली.

आज गणेश चतुर्थीच्या दिवशी शहरातील प्रत्येक रस्त्यावर पीओपी मूर्ती विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. विशेष म्हणजे नागरिकांनीही या दुकानांमध्ये गर्दी केल्याचे दिसून आले. नागरिकांचा विक्रेत्यांना प्रतिसाद मिळाला असला तरी महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने कारवाई केली.

गोकुळपेठ, हुडकेश्वर, गांधीबाग, कांजी हाऊस चौक, जिंजर मॉल जरिपटका, जरिपटका बाजारात पीओपी मूर्ती विक्रेत्यांकडील एकूण ३५ मूर्ती जप्त करण्यात आल्या. एकूण सहा दुकानदारांकडून प्रत्येकी दहा हजार रुपये, असा एकूण ६० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. एकीकडे ही कारवाई सुरू असताना शहराच्या बहुसंख्य भागात पीओपी मूर्तीची सर्रास विक्री करण्यात आली.

रात्रीच्या काळोखात आले ट्रक

महापालिकेच्या कारवाईमुळे पीओपी मूर्ती विक्रेते सावध झाले होते. कारवाईच्या भीतीने दोन, चार मूर्ती दुकानात ठेवल्या जात होत्या. परंतु सोमवारी रात्री शहराच्या अनेक भागात पीओपी मूर्तीचे ट्रक आले. रात्रीच्या काळोख्यात एका दुकानांमध्ये चारशे ते पाचशे मूर्ती उतरविण्यात आल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

मातीच्या मूर्तीची कमतरता

महापालिकेने केलेल्या जनजागृतीमुळे मातीच्या मूर्तीकडे नागरिकांचा कल वाढला. कालपर्यंत अनेकांनी मातीच्या मूर्ती खरेदी केल्या किंवा नोंदणी करून ठेवल्या होत्या. त्यामुळे आज अनेकांना मातीच्या मूर्ती मिळाल्या नाही. त्यामुळे पीओपी मूर्ती खरेदी केल्याचे एका भाविकाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

IND vs ENG, T20I: एकट्या वैभव सूर्यवंशीसाठी इंग्लंडमध्ये वेगळी ड्रेसिंग रुम असणार! पण नेमकं यामागे खरं कारण काय?

Latest Marathi News Live Update : शेती उपसा सिंचन योजनेसाठी वीज कनेक्शन मिळावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण

निळावंतीचं रहस्य आणि गुप्त खजिन्याचा शोध! ब्रिटिशकालीन इतिहासावर आधारित 'इंद्रजाल'चा थरारक फर्स्ट लुक आउट

Solapur Water Rights: दुष्काळी १३ तालुक्यांसाठी ३४ वी पाणी संघर्ष परिषद २६ जूनला मंगळवेढ्यात

SCROLL FOR NEXT