Praful Patel
Praful Patel Sakal
नागपूर

आम्हीसुद्धा स्वबळासाठी सज्ज : प्रफुल पटेल

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यात महाविकास आघाडी आहे हे विसरून जा. महापालिका निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे. ती आपल्याला आपल्याच ताकदीवर जिंकायची आहे, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल (Praful patel) यांनी आम्हीसुद्धा स्वबळासाठी सज्ज असल्याचा इशारा काँग्रेसला (Congress) दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक मंगळवारी गणेशपेठ येथील कार्यालयात पार पडली. बैठकीला पटेल यांच्यासह शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी मंत्री रमेश बंग, शहर निरीक्षक राजेंद्र जैन, सुबोध मोहिते, शब्बीर अहमद विद्रोही, प्रकाश गजभिये, दीनानाथ पडोळे, प्रवीण कुंटे पाटील, अनिल अहीरकर, आभा पांडे, सलील देशमुख, प्रशांत पवार, वर्षा शामकुळे, जावेद हबीब, दिलीप पनकुले, बजरंग सिंह परिहार, शेखर सावरबांधे, रमेश फुले आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रफुल पटेल यांनी महापालिकेची निवडणूक आपल्याला आपल्याच बळावरच लढायची असल्याचे सांगितले. त्यामुळे आता कुणाच्या सहकार्याची अपेक्षा बाळगू नका आणि गाफील राहू नका.सर्वच प्रभागासाठी तुल्यबळ उमेदवार शोधून ठेवा. प्रत्येकाला संधी मिळणार असल्याने आपसात बसून पॅनेल तयार करा, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी कार्यकर्त्यांना दिला.

राज्यात महाविकास आघाडी असली तरी स्थानिक निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वारंवार सांगत आहेत. त्यामुळे आपणही आपल्या ताकदीवर निवडणूक लढण्यासाठी सज्ज राहावे. आपआपले प्रभाग निश्चित करून जनसंपर्क वाढवा, नागरिकांच्या समस्या जाणून घ्या, अशा सूचनाही यावेळी प्रफुल पटेल यांनी केली. महापालिकेच्या निवडणुकीतील यश आपल्यासाठी विधानसभेचे दार उघडून देणार आहे. त्याकरिता राष्ट्रवादीच्या अधिकाधिक जागा निवडून आणाव्या, असेही पटेल म्हणाले. रमेश बंग यांनीसुद्धा तयारीला लागण्याची सूचना कार्यकर्त्यांना केली.

हजार फुटांची घरे करमुक्त करा: पेठे

मुंबईत पाचशे चौरस फुटांच्या इमारती करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. तेथील भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. नागपूरमध्ये हजार चौरस फुटांच्या जागेवर गोरगरीब व मध्यमवर्गीयांची घरे आहेत. त्यामुळे करमाफी देताना नागपूर शहरासाठी हजार चौरस फुटाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी दुनेश्वर पेठे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT