Tadoba 
नागपूर

ताडोबा-अंधारीत पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

बंदीस्त जिप्सीचे डिझाईन्स मागविले; पुरस्कार मिळणार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन अधिक सुरक्षीत करण्यासाठी तेथील व्यवस्थापनाने एक पाऊल समोर टाकले आहे. सफारी जिप्सी वाहनांवर सुरक्षाकवच असणारे डिझाईन डिझायनर्स, फॅब्रिकेटर्स, अभियंता तसेच गॅरेज यांच्याकडून मागवण्यात आले आहे. या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत डिझाईन सादर करावयाचे आहे. योग्य डिझाईन आल्यानंतर प्रधान मुख्य वनंसरक्षक (वन्यजीव) यांच्याकडून हिरवी झेंडी मिळाल्यास पुढील प्रक्रियेला वेग येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

देशातील व्याघ्रप्रकल्पात वाघाने किंवा मांसभक्षक प्राण्याने जिप्सीतील पर्यटकांवर हल्ला केलेले नाही. राज्यात जंगल पर्यटनाचा सर्वाधिक भार ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पावर आहे. वाघांच्या सहज दर्शनामुळे राज्यातीलच नाही तर इतर राज्यातील पर्यटक देखील या व्याघ्रप्रकल्पात येतात. वाघ जिप्सीजवळ येण्याचा प्रकार या व्याघ्रप्रकल्पात बरेचदा घडला आहे. दोन वर्षांपूर्वी या व्याघ्रप्रकल्पात पर्यटक जिप्सीवर वाघ हल्ल्याच्या पवित्र्यात असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित झाला होता.

वाघाने पर्यटक जिप्सीवर हल्ला केल्याच्या घटना गेल्या तीन-चार दशकात तरी समोर आल्या नाहीत. सर्वोत्कृष्ट डिजाईनला २५ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. हे डिझाईन जिप्सीसह इतर वाहनांवर बसवण्यासाठी व्यवस्थापनाकडून मंजूर करण्यात येईल. सहभागी होणाऱ्यांनी एक हजार रुपयांच्या डिझाईन ड्राफ्टसह हे डिझाईन mahaforest.gov.in या संकेतस्थळावर पाठवायचे आहे.

व्याघ्र पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना सुरक्षितता प्रदान करण्याच्या दृष्टीने स्थानिक क्षेत्र संचालकाने बंदीस्त पिंजऱ्याबद्दल निविदा काढलेली आहे. निविदा प्राप्त झाल्यानंतर सुरक्षित पर्याय समोर आल्यास पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. मात्र, अद्याप काहीही निर्णय झालेला नाही.

- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT