corona 
नागपूर

धक्कादायक! खासगी रुग्णालयांनी लपवली माहिती म्हणूनच जास्त कोरोनाबळी... कोणी काढला असा निष्कर्ष...वाचा सविस्तर

राजेश प्रायकर

नागपूर : खाजगी रुग्णालयात कोरोनावर उपचार करताना महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला माहिती देणे बंधनकारक आहे. परंतु खाजगी रुग्णालयांकडून माहिती दिली जात नाही. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची माहितीही येत नाही. यातूनच विलंब होत असून अंतिम क्षणी उपचारासाठी धडपड होत असते. वेळेवर उपचार न झाल्याने कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढले, असा निष्कर्ष आज महापालिकेच्या आरोग्य विभागाने काढला.

महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज शहरातील बाधितांच्या मृत्यूवर नियंत्रणासाठी बैठक घेतली. बैठकीत अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त अमोल चौरपगार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, डॉ. टिकेश बिसेन, पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ. संजय झोडापे उपस्थित होते. मनपाने शहरात सुमारे २१ ठिकाणी चाचणीची व्यवस्था केली आहे. ज्या नागरिकांची चाचणी होत आहे, त्यांच्यावर मनपाच्या नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवण्यात येत आहे. कोरोना कॉल सेंटरच्या माध्यमातून चाचणी झालेल्या व्यक्तीची, गृह विलगीकरणात असलेल्या व्यक्तीची, विलगीकरणातून निघालेल्या व्यक्तींची विचारपूस करण्यात येत आहे, असा दावा आयुक्तांनी केला.

सहकार्याचे आयुक्तांचे आवाहन...

ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत किंवा ज्यांना लक्षणे नाहीत. मात्र जे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल, अशा व्यक्तींनी तातडीने नजिकच्या कोविड टेस्टींग सेंटरमध्ये जाऊन चाचणी करवून घ्यावी. मनपाच्या यंत्रणेचा उपयोग करुन घेत वाढत्या मृत्यूसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुंढे यांनी केले.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT