Railway officer misbehaved with young girl in Nagpur district
Railway officer misbehaved with young girl in Nagpur district  
नागपूर

रेल्वे कर्मचाऱ्यानं केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पोस्को कायद्यांतर्गत कारवाई; नागपूर जिल्ह्यातील घटना 

अमर मोकाशी

भिवापूर (जि. नागपूर):  अल्पवयीन मुलीना खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवत घरात बोलावून त्यांच्याशी लैंगिक चाळे करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.ही घटना बुधवारी सायंकाळी रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या क्वॉटरमध्ये घडली. नरेश कुमार दयानंद शौकीन (वय५०) असे आरोपीचे नाव असून तो रेल्वेच्या नागभिड डिविजनमध्ये ट्रकमन म्हणून नोकरीला आहे..

मागील काही दिवसांपासून तो येथील रेल्वेच्या सर्वंट क्वाटरमध्ये एकटाच राहात आहे. बुधवारी (ता.३० ) याच क्वाटरपासून काही अंतरावर असलेल्या वस्तीतील सुमारे ११ वर्षे वयाच्या दोन मुली त्यांच्या घरासमोरील अंगणात खेळत होत्या. चार वाजताच्या सुमारास आरोपी नरेशकुमार याची नजर त्यांच्यावर पडली. त्याने खाऊ विकत घेण्यासाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून दोघींनाही घरात बोलावले व त्यांच्याशी अश्लिल चाळे केले. 

ही बाब कुणाकडे सांगू नये यासाठी त्याने दोघींनाही काही पैसेसुद्धा दिलेत. मात्र घडलेल्या प्रकाराने घाबरलेल्या मुलींनी सायंकाळी आईवडिल कामावरुन घरी परत आल्यानंतर त्यांना घटनेची माहिती सांगितली. संतापलेल्या पालकांनी लगेच पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

तक्रार मिळताच पोलिसांनी आरोपी नरेशकुमार याला त्याच्या क्वॉटरमधून अटक करुन बेड्या ठोकल्या. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस अधिकारी खोब्रागडे पुढील तपास करीत आहेत.

रेल्वे स्टेशन परिसर झाला ओसाड

नागपूर-नागभिड रेल्वे मार्ग ब्राँड गेजमध्ये परावर्तीत होणार असल्याने या मार्गावरील रेल्वे बंद करण्यात आली. तेव्हापासून येथील रेल्वे स्टेशन परिसर ओोसाड बनला आहे. रेल्वे स्टेशन परिसराला लागून दिघोरा ही मजुरांची वस्ती आहे. स्टेशन परिसरात असलेले बहुतांश सर्वंट क्वॉटर रिकामे आहेत. त्यातीलच एका क्वॉटरमध्ये काही दिवसांपासून आरोपी नरेशकुमार वास्तव्यास आहे. कुणी नागरिक सहसा या क्वॉटरकडे भटकत नाही. त्याचाच फायदा घेत नरेशकुमारने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT