nagpur sakal
नागपूर

खड्ड्यांसाठी पाऊस जबाबदार!

मनपा प्रशासनाचा अजब दावा; रविवारीही खड्डे बुजविण्याचे महापौरांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरातील खड्ड्यांसाठी आम्ही नाही तर पाऊस जबाबदार आहे, असा अजब दावा आज महापालिका प्रशासनाने सभागृहात केला. खड्ड्यांसाठी इतरांना दोष देणे योग्य होणार नाही, अशी पुस्ती जोडत प्रशासनाने हात झटकले. खड्ड्यांवरून आज झालेल्या मनपा सभेत सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. आयुक्तांनीही यंदाचा पावसाळा लांबल्याने खड्डे दुरुस्ती लांबल्याचे नमूद केले. सदस्यांचा रोष बघून महापौर दयाशंकर तिवारी रविवारी सुटीच्या दिवशीही खड्डे बुजवा, डिसेंबरपूर्वी शहर खड्डे मुक्त करा, असे निर्देश प्रशासनाला दिले.

शहरातील खड्ड्यांसह पायाभूत सुविधा तसेच उत्पन्न, आतापर्यंत केल्या गेलेल्या कामाचा प्रगती अहवालासंदर्भात आज महापालिकेची विशेष सभा ऑनलाइन पद्धतीने पार पडली. खड्ड्यांवरून प्रशासनावर सर्वच सदस्यांनी आगपाखड केली. प्रशासनावर वचक नसल्याचा आरोप यावेळी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी केला. कॉंग्रेसच्या हर्षला साबळे यांनी खड्ड्यांमुळे अपघात होत असल्याकडे लक्ष वेधत अधिकारी केवळ खुर्च्या तोडत असल्याची संतप्त भावना व्यक्त केली. कॉंग्रेसचेच दिनेश यादव यांनी त्यांच्या प्रभागातील खड्डे बुजविले पण डांबरच टाकले नसल्याने रस्ता पुन्हा जैसे थे झाल्याचा आरोप केला. दर्शनी धवड यांनी त्यांच्या प्रभागातील खड्ड्यांची स्थिती सांगितली.

सत्ताधारी बाकावरील पिंटू झलके यांनी खड्डेमुक्त शहरासाठी आणखी किती काळ लागेल? असा संतप्त सवाल केला. हॉटमिक्स प्रकल्प कालबाह्य झाला असून नवीन प्रकल्प तयार करण्याची सूचना त्यांनी केली. भाजपचे विकी कुकरेजा, मनीष अतकरे, बाल्या बोरकर, श्रद्धा पाठक, राजेंद्र सोनकुसळे यांनीही प्रशासनावर जोरदार हल्ला चढविला. स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी पावसाळ्यात खड्डे बुजविण्याची प्रक्रिया सुरू राहील, असा प्रकल्प सुरू करता येईल काय? यावर विचार करण्याची सूचना केली.

अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांनी खड्डे बुजविण्यासाठी भरीव तरतूद असताना खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांसाठी जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करीत पदाधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याचा आरोप केला. बसपाचे जितेंद्र घोडेस्वार यांनीही खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांसाठी कुणावर गुन्हा दाखल करावा, असा सवाल केला. सदस्यांच्या संतापाची धार बोथट करण्यासाठी प्रशासनाकडून कार्यकारी अभियंत्याने खड्ड्यांसाठी सातत्याने येत असलेल्या पावसाला जबाबदार धरले. आयुक्त राधाकृष्णन बी. यांनीही त्यांच्या निवेदनातून पाऊस लांबल्याने खड्डे बुजविण्यात अडथळा निर्माण झाल्याचे सांगितले.

खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग देणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी रविवारची सुटी विसरून त्या दिवशीही खड्डे बुजवावे. झोनस्तरावर विविध विभागासाठी तरतूद असून ती कामे झालीच पाहिजे. मनपा, नासुप्र, राज्य सरकार व केंद्र सरकारच्या रस्त्यांवरील खड्डे किती याबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविणे गरजेचे आहे. येत्या आठ दिवसांत शहरातील खड्डे बुजविण्यासाठी नियोजन करावे.

- दयाशंकर तिवारी, महापौर.

कोण किती खड्डे बुजविणार?

  1. महापालिका हॉट मिक्स विभाग - २७ हजार चौरस मीटर

  2. नासुप्र - २३ हजार चौरस मीटर

  3. जेटपॅचरने बुजविण्यात येणारे खड्डे - ९ हजार चौरस मीटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT