Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University 
नागपूर

नागपूर विद्यापीठाचं गणित कच्चे; विद्यार्थ्याला दिले 400 पैकी 480 गुण

एका विद्यार्थ्याला ४०० पैकी तब्बल ४८० गुण मिळाल्याची गुणपत्रिका प्राप्त झाल्याने त्याला आश्चर्याचा धक्का

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाच्या अक्षम्य चुकांचा फटका आता विद्यार्थ्यांना बसू लागला आहे. एका विद्यार्थ्याला ४०० पैकी तब्बल ४८० गुण मिळाल्याची गुणपत्रिका प्राप्त झाल्याने त्याला आश्चर्याचा धक्का बसला. निकाल दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे अनेकदा चकरा मारल्यानंतरही न्याय मिळत नसल्याची तक्रार विधीसभा सदस्य प्रवीण उदापूरे यांनी केली आहे.

नागपूर विद्यापीठ आणि चुका ही अनेक वर्षापासून सुरु असलेली परंपरा अद्यापही सुरुच आहे. यापूर्वी कोहचाडे प्रकरणामुळे विद्यापीठाची कुप्रसिद्धी झाली होती. पीएच.डी.मधील दोन विद्यार्थिनींना एका विभाग प्रमुखाने दिलेल्या छळाचा प्रकार राज्यभर गाजत आहे. त्यात आता गुणपत्रिकांमध्ये होणाऱ्या चुका समोर आल्या आहेत.

याआधीही परीक्षा विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर गुणपत्रिकांमध्ये होणाऱ्या चुकांचा प्रकार समोर आला होता. त्यात आता हा नवीन प्रकार समोर आला आहे. एका विद्यार्थ्याच्या गुणपत्रिकेवर चक्क ४८० एकूण गुण छापून आले आहेत. प्रत्येक विषयाला शंभर गुण आहेत.

याप्रमाणे चार विषयाला चारशे गुण असणे आवश्यक होते. मात्र ४८० गुण छापून आल्याने विद्यार्थ्याला आश्चर्याचा धक्का बसला आहे. याबाबत तक्रार करूनही विद्यापीठाकडून त्याला काहीही प्रतिसाद मिळालेला नाही, असे उदापूरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT