Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University PHD researchers fees rise
Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University PHD researchers fees rise sakal
नागपूर

नागपूर : पीएच.डी संशोधन झाले महाग!

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पीएच.डी. करणे आता संशोधकांसाठी महागडे ठरणार आहे. अलीकडेच विद्यापीठाने पीएचडीच्या शुल्कात तिपटीने वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि होतकरू विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी बऱ्याच प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

विद्यापीठाद्वारे पीएच.डी.च्या नव्या दिशानिर्देशांना मान्यता देण्यात आली. या दिशानिर्देशांमध्ये अनेक खासगी संशोधन केंद्रांचाही समावेश करण्यात आला. त्यानुसार २०१६ मध्ये संशोधक नोंदणीसाठी १ हजार रुपये घेण्यात येत असत, आता त्यासाठी २ हजार ५०० रुपये मोजावे लागणार आहेत. त्याच बरोबर प्रबंध सादर करण्याचे शुल्क देखील ८ हजारावरुन १२ हजार रुपये करण्यात आले आहे. पूर्वी, जिथे पीएच.डी. पर्यवेक्षक म्हणून मान्यता मिळविण्यासाठी १ हजार ५०० रुपये लागायचे, आता तुम्हाला त्यासाठी ५ हजार रुपये द्यावे लागतील.

एवढेच नाही तर संशोधन केंद्रातील प्रवेश शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. विद्यापीठातील महाविद्यालय किंवा पदव्युत्तर विभाग किंवा अनुदानित संशोधन केंद्रात प्रवेश घेण्यासाठी विज्ञान शाखांमधील ‘रिसर्च स्कॉलर’कडून वार्षिक ६ हजार रुपये शुल्क आकारले जाईल. पूर्वी विज्ञान शाखेसाठी ५ हजार रुपये मोजावे लागत होते. पूर्वी जिथे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतील संशोधकांना वार्षिक १० हजार रुपये मानधन मिळायचे, आता त्यांना १२ हजार रुपये द्यावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे मानव्यशास्त्र, वाणिज्य आणि आंतरविद्याशाखीय विद्याशाखेच्या संशोधकांना पूर्वी ४ हजार रुपये शुल्क आकारले जात होते, आता त्यांना वार्षिक ५ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

असे आहे वाढलेले शुल्क

  • संशोधक नोंदणीसाठी - २,५००

  • प्रबंध सादर करणे - १२,०००

  • पीएच.डी. पर्यवेक्षक मान्यता - ५,०००

  • संशोधकाकडून वार्षिक शुल्क (अनुदानित)- ६,०००

  • विनाअनुदात महाविद्यालयातील केंद्रावर - ७,०००

सेल्फ फायनान्स रिसर्च सेंटर महाग

सेल्फ फायनान्स रिसर्च सेंटरच्या वार्षिक प्रवेश शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. सायन्स फॅकल्टीचे विद्वान, जिथे आधी वार्षिक ६ हजार रुपये मानधन घेत होते, आता त्यांना ७००० रुपये द्यावे लागतील. तर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या विषयांसाठी संशोधकाला आता १६ हजारांऐवजी १९ हजार भरावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे मानविकी, वाणिज्य आणि आंतरविद्याशाखीय विद्याशाखेच्या संशोधकांना ४ हजार ऐवजी ५ हजार रुपये वार्षिक शुल्क भरावे लागणार आहे.

कालांतराने होणारा खर्च लक्षात घेऊन शुल्कात वाढ करण्यात आली आहे. आम्ही प्रबंध मूल्यांकन करणाऱ्यांचे शुल्कदेखील २ हजारापर्यंत वाढवली आहे. त्याचप्रमाणे पीएच.डी. परीक्षकांना दिल्या जाणाऱ्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे. यासोबतच इतर प्रक्रियेच्या शुल्कातही भर पडते. या कारणास्तव पीएच.डी.च्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- डॉ.राजू हिवसे, कुलसचिव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT