Corona Death Google file photo
नागपूर

कोविड उपचाराचे दर निश्चित : विलगीकरणासह व्हेंटिलेटरचे दर नऊ हजार रुपये

राजेश प्रायकर

नागपूर : कोविड उपचारांसाठी (Covid treatment) खासगी रुग्णालयांमध्ये येणारा अवाच्या सव्वा खर्च थांबविण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित (Private hospital treatment rates fixed) करण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने आता शहरांचे वर्गीकरण करून दर निश्चित (Rates fixed by categorizing cities) केले आहे. नागपूर अ वर्गात असून, शहरात विलगीकरणासह व्हेंटिलेटर आयसीयूचा दर नऊ हजार रुपये प्रतिदिन निश्चित करण्यात आला. (Rate-of-covid-treatment-fixed-in-Nagpur)

खासगी रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी ८० टक्के खाटांसाठी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार व उर्वरित २० टक्के खाटांसाठी खासगी रुग्णालयांनी निश्चित केलेल्या दरानुसार दर आकारणी करण्याबाबतची अधिसूचना संपली. मंगळवारी राज्य सरकारने या अधिसूचनेस मुदतवाढ देताना त्यात शहरांच्या वर्गीकरणानुसार सुधारणा केली आहे.

यापूर्वीच्या अधिसूचनेत मोठ्या शहरातील रुग्णालये व अति दुर्गम भागातील रुग्णालयांसाठी उपचारांचे दर एकच होते. शहरांच्या वर्गीकरणामुळे आता उपचारांच्या खर्चात मोठा दिलासा मिळणार आहे. दरासाठी शहरांची अ, ब, क अशी वर्गवारी करण्यात आली आहे. नागपूर अ वर्गात असल्याने शहरातील नागरिकांना अधिक दिलासा नसला तरी ग्रामीण भागात ब व क नगर परिषद परिसरात तुलनेने कमी खर्चात उपचार शक्य होतील. यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधे, बेड्सचा खर्च व जेवण याचा समावेश. कोविड चाचणीचा खर्च निश्चित केलेल्या दराप्रमाणे द्यावा लागेल. केवळ मोठ्या चाचण्या व तपासणी तसेच उच्च पातळीवरील औषधी यातून वगळली आहेत.

शहरासाठी निश्चित दर

विलगीकरणासाठी प्रती दिन - ४ हजार रुपये

व्हेंटिलेटरसह आयसीयू व विलगीकरण - ९ हजार रुपये

केवळ आयसीयू व विलगीकरण - ७ हजार ५०० रुपये

(Rate-of-covid-treatment-fixed-in-Nagpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT