ravi rana 
नागपूर

मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना गुंडागर्दीचे आदेश दिले

सकाळ डिजिटल टीम

अमरावती : १५ ऑगस्टचा कार्यक्रम सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीय सहायकाला स्वातंत्र्यदिन कोणता आहे, असा प्रश्न विचारला. मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्यदिन सुवर्ण आहे की हीरक, हे माहिती नाही. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा केली. यामुळे चांगलाच वादंग झाला. आज जर बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांचे कान नक्कीच पकडले असते, असे आमदार रवी राणा म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे केंद्रीय मंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मंगळवारी अटक करण्यात आली. केवळ बोलल्यामुळे केंद्रीय मंत्र्याला अटक केली जात असेल तर हे चुकीचे आहे. इंग्रजांशी लढून देश स्वातंत्र्य झाले. या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली. मात्र, हा स्वातंत्र्य दिन कोणात? हे मुख्यमंत्र्यांना माहिती नाही. यावर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांचे कान पकडले असते, असे नवनीत राणा म्हणाले.

राज्यात महिलांवर अत्याचार होत आहे. महिला खासदारंच्याविरोधात शिवसेनेचे नेते अपशब्द वापरत आहे. मात्र, त्यांच्यावर कारवाई होत नाही. नारायण राणे हे वरिष्ठ नेते आहे. त्यांना जेवणाच्या ताटावरून उचलून पोलिसांनी नेले. ही पोलिसांची दडपशाही व हुकूमशाही आहे. हे अत्यंत अशोभनीय आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना गुंडागर्दीचे आदेश दिले आहे, असेही नारायण राणे म्हणाले.

राज्यात कायदा, सुव्यवस्था नाही आहे का?

शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सीपींना फोन करून मला तुरुंगात टाकण्याचे आदेश दिले होते. आता नारायण राणा यांचे मागे लागून तुरुंगात टाकले. राज्यात शिवसैनिकांची गुंडागर्दी सुरू आहे. तेव्हा राज्यात कायदा, सुव्यवस्था नाही आहे का, असा प्रश्न रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला.

कारवाईचे निषेध

केंद्रीय मंत्री नारायण राणा यांना दरोड्यासारखी वागणूक दिली. याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो. या राज्यात आता कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. कुठेतरी उद्धव ठाकरे यांची हुकूमशाही सुरू आहे. राज्यात राष्ट्रपती शासन लागले पाहिजे, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे, असेही रवी राणा म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT