ruppes withdrawn from womans account by hacking Google Pay
ruppes withdrawn from womans account by hacking Google Pay 
नागपूर

‘गुगल पे’ वापरताय सावध व्हा, महिलेच्या खात्यातून लांबविले ८५ हजार  

अनिल कांबळे

नागपूर  ः वर्षाअखेरीस सायबर क्रिमिनल्स सक्रिय झाले असून, आता फोन पे आणि गुगल पे वापरणाऱ्यांना त्यांना टार्गेट केले आहे. चक्क गुगल पे हॅक करून सायबर चोर पैसे काढत आहेत. त्यामुळे मोबाईल ॲपवरून ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. नंदनवनमध्ये एका महिलेचा फोन हॅक करून गुगल पेमधून चक्क ८५ हजार रुपये सायबर क्रिमिनलने उडविल्याची घटना उघडकीस आली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम कपिल शेंडे (२५, रा. दर्शन कॉलनी, नंदनवन) यांनी गुगल पे डाऊनलोड केले आणि त्याचा वापरही सुरळीत सुरू होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी गुगल पे वापरले नव्हते. त्यामुळे गुगल पे ॲप बंद पडले. त्यांनी कस्टमर केअरला फोन करून तक्रार केली. १४ डिसेंबरला पूनम यांना एक फोन आला. ‘फोन पे कार्यालयातील कस्टमर केअरमधून बोलत आहे, तुमच्या तक्रारीचे समाधान करण्यासाठी फोन केला आहे’अशी माहिती दिली. 

गुगल पे सुरू करण्यासाठी एक लिंक पाठविण्यात आली असून, तुम्ही केवळ ती क्लिक करा. तुमचा प्रॉब्लेम सुटून जाईन, अशी माहिती दिली. पूनम यांनी आलेल्या लिंकवर क्लिक केले. त्यानंतर मोबाईल हॅंग झाला. त्याचा डिस्प्ले गेला आणि पाच मिनिटानंतर फोन पुन्हा सुरू झाला. पूनम यांना लगेच ५९ हजार ९९६ रुपये बॅंक खात्यातून काढल्याचा मॅसेज आला आणि त्यांना धक्काच बसला.
 

पुन्हा केला फोन

पूनम यांच्या खात्यातून पैसे काढल्याचे कळताच त्यांनी पुन्हा त्याच क्रमांकावर फोन केला. पैसे अकाऊंटमधून काढण्यात आल्याची  माहिती दिली. आरोपीने एक ॲप मोबाईलवर डाऊनलोड करायला सांगितले. पूनम यांनी पैसे परत मिळतील या आशेने ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर २४ हजार ९९९ रुपये खात्यातून काढल्याचा मॅसेज आला. सायबर क्रिमिनल्सने खात्यातून पैसे उडविल्याचे लक्षात येताच त्यांनी नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.
 

सुरक्षित ॲप्सची निवड करा
ऑनलाईन पेमेंट करण्यापूर्वी मोबाईलमध्ये सुरक्षित ॲप्सची निवड करा. सायबर क्रिमिनल्स लिंक आणि कोणतेही ॲप डाऊनलोड करण्यास लावत असतील तर धोका ओळखा. अशा वेळी ग्राहकांनी सतर्क होणे गरजेचे आहे. जर कुणाचेही पैसे खात्यातून उडविल्यास पोलिसांकडे त्वरित तक्रार करा. तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न पोलिस करतील.
- केशव वाघ, (सहायक पोलिस निरीक्षक, सायबर क्राईम)

संपादन : अतुल मांगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प; CSMT स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला

SCROLL FOR NEXT