Safe delivery of a pregnant woman in Nagpur 
नागपूर

प्रसूतीपूर्वी केलेल्या चाचणीत अहवाल आला निगेटिव्ह... चिमुकला जन्मतःच रडला अन्‌ डॉक्‍टर म्हणाले हे...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : चार दिवसांपूर्वी मेयोच्या डॉक्‍टरांनी देवदूत बनून कोरोनाबाधित गर्भवतीची प्रसूती केली. तिने गोंडस मुलीला जन्म दिला. रविवारी (ता. 3) मेडिकलमधील डॉक्‍टरांनी "कोविड-19 रुग्णालयात' डॉक्‍टरांनी एका मातेची सुरक्षित प्रसूती केली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. विशेष असे की, काही दिवसांपूर्वी ही गर्भवती कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला होता. परंतु, प्रसूतीपूर्वी केलेल्या चाचणीत कोरोनामुक्त आढळली. 

सतरंजीपुरा येथील 28 वर्षीय महिला 18 एप्रिल रोजी मेडिकलमध्ये भरती झाली होती. ती कोरोनाबाधित असल्याचा अहवाल मेयोतील प्रयोगशाळेने दिला होता. यानंतर या महिलेच्या प्रसूतीसाठी स्वतंत्र प्रसूती कक्ष तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, मेडिकलमध्ये कोविड-19 हॉस्पिटल तयार करण्यात आले. यामुळे स्वतंत्र कक्षाची गरज भासली नाही. मात्र, प्रसूतीपूर्वी या महिलेची 30 एप्रिल व 1 मे रोजी घेण्यात आलेल्या चाचणीत कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे डॉक्‍टरांनी समाधान व्यक्त केले.

चिमुकला जन्मतःच रडला यामुळे डॉक्‍टरांनी हे बाळदेखील सामान्य असल्याचे सांगितले. मात्र, खबरदारी म्हणून महिलेने जन्म दिलेल्या नवजात बाळाचीही 48 ते 72 तासांमध्ये कोरोना तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, आतापर्यंतच्या इतिहासात गर्भवती कोरोनाबाधित आढळल्यास तिच्या मुलाला हा आजार होण्याची शक्‍यता कमी असते. 

मेयोतील "ती' चिमुकली निगेटिव्ह

मेयोतील ती गर्भवती कोरोनाबाधित असल्याची माहिती शस्त्रक्रियेच्या टेबलवर घेतल्यानंतर कळली होती. मात्र, डॉक्‍टरांनी तिला दूर लोटले नाही. मेयोतील डॉक्‍टरांनी देवदूत बनून कोरोनाबाधित गर्भवतीची 29 एप्रिलला प्रसूती केली. तिने गोंडस मुलीला जन्म दिला. चिमुकलीच्या दोन्ही कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्या. आईने दोन्ही हात जोडून या अल्ला... असे म्हणत मोकळ्या आकाशाकडे बघितले.

मुलीला कुशीत घेण्यासाठी ती आतूर

नऊ महिने पोटात वाढवल्यानंतर मायलेकींची ताटातूट झाली होती. सध्या या चिमुकलीला लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात ठेवले आहे. आपल्या मुलीला कुशीत घेण्यासाठी ती माता आतूर आहे. तिचा जीव कासाविस होत आहे. मात्र, जोपर्यंत माता कोरोनाबाधित आहे, तोपर्यंत चिमुकलीला तिच्या कुशीत देता येत नाही. सूत्रानुसार, 48 तासांनंतर या चिमुकलीची पहिली कोरोना चाचणी केली. त्यानंतर आणखी एकदा केलेल्या कोरोना चाचणीत ही चिमुकली निगेटिव्ह आली. ही महिला मोमिनपुरा येथील रहिवासी आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj jarange: जरांगेंच्या आंदोलनाआडून सरकार उलथवण्याचा डाव, विरोधकांसह अजित पवारांचे आमदारही सामील; लक्ष्मण हाकेंचा मोठा आरोप

Latest Maharashtra News Updates : बाळासाहेब थोरात यांची विखे पाटलांवर टीका

Devendra Fadnavis : आदिवासी विकास विभागातील भरतीवरून वाद; 'बिऱ्हाड' आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणार

१८ वर्षानंतर एस श्रीसंथला कानाखाली मारल्याचा Video Viral, हरभजन सिंगमुळे गाजले होते प्रकरण; ललित मोदीने दाखवली क्लीप

Urjit Patel: कोण आहेत उर्जित पटेल? IMFमध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती; नोटाबंदीत बजावली महत्त्वाची भूमिका

SCROLL FOR NEXT