sangharsh bhimrao mhaiskar story of fulfilled dreams start from hut making cinema Sakal
नागपूर

Motivational Story : डोळ्यांत साठवेलेलं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी... टिनाच्या झोपडीतून ‘संघर्ष’ची वाटचाल

Sangharsh Bhimrao Mhaiskar Story : डोळ्यांत साठवेलेलं स्वप्नं पूर्ण करण्याची क्षमता घेऊन मुंबईच्या सिनेसृष्टीतून नागपुरात येऊन स्थिरावलेला खाणीतील हा हिरा...नाव संघर्ष भीमराव म्हैसकर.

केवल जीवनतारे

नागपूर : डोळ्यांत साठवेलेलं स्वप्नं पूर्ण करण्याची क्षमता घेऊन मुंबईच्या सिनेसृष्टीतून नागपुरात येऊन स्थिरावलेला खाणीतील हा हिरा...नाव संघर्ष भीमराव म्हैसकर. लाईट्स कॅमेरा ॲक्शन म्हटल्यानंतर जे चित्र नजरेसमोर येते, ते सारं साहित्य दहा बाय दहा फुटाच्या टिनाच्या झोपडीत पसरलेले. जादूसारखे बोटांना संगणकाच्या की-बोर्डवर नाचवत सिनेमाची एडिटिंग करत बसलेला बावीशीतील संघर्ष.

संघर्ष मुळचा दक्षिण नागपूरच्या मागास भागातील शताब्दीनगरातील. वडील भीमराव, आई संगीता यांनी संघर्षला यशवंतराव चव्हाण सैनिकी शाळेत दाखल केले. यामुळे संघर्षच्या मनात एनडीए अर्थात नॅशनल डिफेन्स ॲकादमीतून ऑफिसर होऊ असे बीज रोवले गेले, मात्र सिनेमा बघण्याच्या सवयीने वेगळ्याच मार्गावर पोचवले.

सिनेमा बघणे हा एकमेव ध्यास मनात असल्याने बारावीनंतर ॲनिमेशनचे धडे आत्मसात केले आणि संघर्षने थेट मुंबईतील सिनेमाच्या दुनियेत पोचवले. डिजिटल इंटरमिडियाची पदविकेचे प्रशिक्षण घेत असताना सिनेमाच्या छायाचित्रणाच्या कच्च्या फाईलमधून एडिटिंग करण्यापासून तर व्हिएफएक्स आणि पोस्ट प्रॉडक्शनपर्यंत सिनेमातील कलर सायन्समध्ये त्याचा हातखंडा झाला.

सिनेमाच्या एडिटिंग पासून तर डिआयसारख्या तांत्रिक बाजू सांभाळण्याचे तंत्र अवगत असतानाच सिनेमाच्या कथेला स्क्रीन प्लेच्या साच्यात बसवण्याचे कसबही अष्टपैलू संघर्षने आत्मसात केले.

ॲडिक्शन पासून इन्व्हिजिबल पर्यंत

मुलगा वयात येत असताना भावनांचा खेळ मांडणाऱ्या मुलांचे भावविश्व ‘ॲडिक्शन’ आणि मानवी इंद्रियावरील ‘इन्व्हिजिबल ऑर्गन’ या दोन कथांवर स्क्रीन प्ले लिहिले. त्यावर शार्ट फिल्म तयार होत आहेत. अभिनयाचे धडे घेण्यासाठी शिबिरात पोचला, मात्र अभिनय वगळता सिनेमा तयार करण्याचे सर्व डिजिटल तंत्र संघर्ष शिकला. लवकरच संघर्षने टिनाच्या झोपडीतून सुरु केलेला सिनेमा थिएटरमध्ये बघण्याची संधी नागपूरकरांना मिळेल, यासाठी अनेक जण शुभेच्छा देत आहेत.

मुंबईत अनेक सिनेमांचे एडिटिंग करतानाच डीआयचे काम करून सहज रोजीरोटी मिळवणे शक्य होते. परंतु अस्तित्व शुन्य होते. आतापर्यंतच्या माझ्या जीवनाचे गणित मांडताना सिनेमा वगळला तर माझ्या आयुष्यात बाकी शुन्य राहील. मुंबईत सिनेमाच्या दुनियेत राहूनही सिनेमा तयार करणे माझ्यासाठी आव्हान होते, मात्र नागपुरात झोपडीत राहून सिनेमा तयार करण्यासाठी माझे मन आता धावत सुटले आहे.

-संघर्ष म्हैसकर, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बिहारमध्ये NDA मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षातून किती मंत्री होणार? 'या' दिवशी शपथविधी सोहळ्याची शक्यता

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

Solapur Political : मंगळवेढ्यात काँग्रेसचा पंढरपूरप्रमाणे आघाडीसोबत लढण्याचा पॅटर्न!

मेडिक्लेम पॉलिसी घेताना अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे; अपुऱ्या अर्जामुळे...

SCROLL FOR NEXT