Sakal News
Sakal News 
नागपूर

मेडिकलमध्ये कोरोनाबाधित युवकाला दिला प्लाझ्मा

केवल जीवनतारे

नागपूर:  नागपुरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूवर सुरक्षित आणि प्रभावी लस किंवा औषध नाही. यामुळेच कोरोनाचा पराभव करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग सुरू झाला. काही रुग्ण बरे झाल्याने आशेचा किरण दिसू लागला आहे. मेडिकलमध्ये पहिला प्रयोग अमरावती येथील डॉक्टरवर करण्यात आला होता. मात्र रुग्णांकडून मागणी होत नसल्याने प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग मंदावला. मात्र मेडिकलमधील डॉक्टरांच्या पुढाकारातून एका पस्तीशीतील युवकावर दुसऱ्यांदा प्रयोग करण्यात आला. सलग दोन दिवस ४०० मिलीलीटर प्लझ्मा या युवकाला देण्यात आला. सद्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. प्लाझ्मा देताना या युवकाच्या प्लाझ्माशी संबधित रक्ताच्या काही चाचण्या करण्यात आल्या.
राज्यभरात नागपूरच्या मेडिकलसहित १७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्लाझ्मा थेरेपी क्‍लिनिकल ट्रायल झाली. विशेष असे की, या प्लाझ्मा थेरपी युनिटचे राज्यातील नेतृत्व मेडिकल करीत आहेत. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात प्लाझ्मा थेरपी ट्रायल साईटचे राज्याचे समन्वयक डॉ. सुशांत मेश्राम, नोडल ऑफिसर डॉ. मोहमंद फैजल, रक्तपेढीचे प्रमुख डॉ. संजय पराते यांच्या प्रयत्नातून हा प्रयोग यशस्वी झाला आहे. मेडिकलमध्ये अमरावती येथील ४५ वर्षीय डॉक्टरवर पहिल्यांदा प्रयोग केला. दुसरा प्रयोग मेडिकलमध्ये दाखल असलेल्या ३५ वर्षीय युवकावर मंगळवारपासून सुरू करण्यात आला.

 ११ ऑगस्ट रोजी २०० मिलिलीटर प्लाझ्मा देण्यात आला. २४ तास डॉक्टरांच्या निरीक्षणात ठेवण्यात आल्यानंतर दुसरा २०० मिलीलीटरचा डोस बुधवारी (ता.१२) दुपारी देण्यात आला आहे. अशाप्रकारे ४०० मिलीलिटर प्लाझ्माचा डोस दिला आहे. दै. सकाळने दोन दिवसंपुर्वी मृत्यूदर वाढल्यानतंरही प्लाझ्मा थेरपीचा वापर का होत नाही, असे वृत्त प्रकाशित केल्यानंतर केल्यानंतर प्लाझ्मा थेरपीच्या दुसरा प्रयोग बुधवारी करण्यात आला. मेडिकलमध्ये होत असलेल्या प्रयोगाने वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव यांच्यासह संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी नागपूरच्या मेडिकलवर टाकलेला विश्‍वास सार्थ ठरत आहे, हे मात्र नक्की.

काळजी घेत प्रयोग
प्लाझ्मा थेरपीत प्लाझ्मातील कोरोनाविरोधी अन्टिबॉडीचे (कोरोनारोधक पांढऱ्या पेशी) प्रमाण आणि गुणवत्ता या बाबी महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक व्यक्तीनुसार अन्टिबॉडीचे गणित वेगवेगळेच असते. त्यामुळे प्लाझ्मा थेरपी करणे सोपे नाही. शिवाय एका व्यक्तीचा प्लाझ्मा दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात नवी गुंतागुंत निर्माण करण्याचा धोका आहे. त्यामुळे प्लाझ्माची तसेच ज्या रुग्णावर प्लाझ्मा थेरपीने उपचार करणार त्याची निवड करताना काळजी घेण्यात आली. या थेरपी युनिटचे प्रकल्प संचालक अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा आहेत.

संपादन-अनिल यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT