नागपूर

१७ सप्टेंबर ; जागतिक रुग्ण सुरक्षा दिन

रुग्ण हक्काचे व्हावे संरक्षण; वैद्यक तज्ज्ञांकडून हवे सामूहिक प्रयत्न

केवल जीवनतारे

नागपूर : आजाराचे लवकर निदान न होते, यामुळे उपचार योग्य दिशेने सुरू होत नाही. यातूनच चुकीचे उपचार होण्याची भिती आहे. रुग्णालयातील जंतुसंसर्ग, वैद्यकीय हलगर्जीपणा अशा नानाविध कारणांमुळे दरवर्षी लाखो रुग्णांना जीव गमवावा लागतो. तर दरवर्षी राज्यात १५०० गर्भवती माता मृत्युमुखी पडतात. अपघातामध्ये अपंगत्व येते. अशावेळी उपचाराची माहिती मिळावी यासाठी रुग्णांना हक्क हवेत. त्यांच्या हक्काचे संरक्षण करणारा कायद्या हवा. २०१४ मध्ये रुग्ण हक्कांना मान्यता देण्यासंदर्भात नियमावली तयार झाली होती. मात्र रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी वैद्यकीय आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.

रुग्णांच्या हक्कांबाबत जागरुकता आणण्यासाठी दरवर्षी १७ सप्टेंबर हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने वर्ल्ड पेशंट सेफ्टी डे (जागतिक रुग्ण सुरक्षा दिन) म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार विकसित देशांमध्ये दहा रुग्णांच्या मागे एका रुग्णाला उपचार घेताना नकळत घडणाऱ्या रुग्णालयीन संसर्गाचे परिणाम भोगावे लागतात. विकसित देशांमध्ये अशी अवस्था असेल तर भारतासारख्या देशात काय अवस्था असेल याचा विचार करण्याची गरज वैद्यक तज्ज्ञ व्यक्त करतात. रुग्णांना संरक्षण देण्यासाठी कायद्यात रुग्ण हक्कांचा समावेश हवा आहे.

रुग्ण हक्काच्या कायद्याच्या फाईलमध्ये

जून २०१४ मध्ये रुग्ण हक्कांना मान्यता देणारी नियमावली तयार करण्यात आली होती. खासगी सेवा देणाऱ्या डॉक्‍टरांनाही याची माहिती व्हावी यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनकडे नियमावली सोपविली. रुग्णांचे हक्क असावेत की नाही यासंदर्भातील मते जाणून घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर माहिती सादर करण्यात आली. इंडियन मेडिकल असोसिएशनने रुग्ण हक्‍काचा कायदा मान्य केला. परंतु, फाईल मात्र अद्यापही बंद आहे.

रुग्णांच्या हिताचा कायद्या हवा आहे. सरकारी आरोग्यसेवेत उपचाराचा दर्जा राखला जावा. खासगीत दर्जा सांभाळला जातो, परंतु यात नफेखोरीला वाव आहे. खासगीत रुग्ण हक्काचे संरक्षण होत नाही. बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्‍ट (सुधारित) कायदा करून रुग्ण हक्कांची सनद तयार केली आहे. २०१४ पासून स्मरणपत्रातून सरकारला आठवण करून देण्यात आली आहे.

आपल्याकडे रुग्णांना मार्गदर्शन करणारी यंत्रणा तयार करण्यात यावी रुग्णांनाही त्यांचे अधिकार आहेत. रुग्णांच्या सर्व तक्रारीचा निपटारा करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक कक्ष तयार करण्यात आला आहे. उपचारासाठी रुग्ण येताच योग्य उपचाराची जबाबदारी रुग्णालयांची आहे. डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी यांनी सकारात्मक विचारातून सामूहिक प्रयत्नातून सेवाव्रती व्हावे.

- डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता, मेडिकल

प्रतिकूल परिस्थितीत रुग्णांची हानी होते. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या सर्वेक्षणात कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये १३४ दशलक्ष मातांना प्रतिकूल परिस्थितीत रुग्णालयात दाखल क रावे लागते. यांपैकी २.६ दशलक्ष मातांचा मृत्यू होतो. परंतु उच्च उत्पन्न असलेल्या देशात १० पैकी केवळ १ रुग्ण रुग्णालयीन संसर्गामुळे बाधित होतो. हे परस्परविरोधी चित्र दिसते.

- डॉ. मनोज मानकर, औषध निर्माता, त्वचारोग विभाग, नागपूर.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अपगर (APGAR) बघणे आवश्यक आहे. यात रंग, ह्दयगती, प्रतिझेप, स्नायूटोन श्वास या पाच गोष्टीकडे लक्ष तज्ज्ञांनी बघावे. वैद्यक तज्ज्ञ आणि पॅरामेडिकल स्टाफ यांच्या उपलब्धतेवर रुग्णसेवा बरीच अवलंबून आहे. मुबलक कर्मचारी असले की, कर्मचाऱ्यांनी तणावमुक्त होऊन सेवा करतात. याचा सकारात्मक परिमाण दिसतो.

- जयश्री सरथ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayushman Card : कोणताही प्रीमियम न भरता मिळवा फ्री Health Insurance, फक्त WhatsApp वर ‘Hi’ ... जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Kas Plateau Flower Season 2026 : कास पठारावरील फुलांचा हंगाम 'या' तारखेपासून होणार सुरू; ऑनलाईन बुकिंग कधी? हुल्लडबाजी करणाऱ्यांना बसणार चाप

MSEDCL Bribe Case: रीलिज ऑर्डरसाठी लाचेची मागणी भोवली; महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला एसीबीने रंगेहाथ पकडले

Latest Marathi News Live Update : ऑगस्टमध्ये मराठवाडा आणि विदर्भ कोरडे; सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची आशा

'मी दादा कोंडकेसोबत 3 सिनेमे केले परंतु नंतर...'' अशोक सराफ आठवण सांगताना म्हणाले..'ते डबल मिनिंगकडे...'

SCROLL FOR NEXT