Photo and video of the woman who was shot by her servant 
नागपूर

नोकराचा आला मालकिणीवर जीव; फोटोशूट करून केली भलतीच मागणी, आता...

अनिल कांबळे

नागपूर : मालकीण आंघोळ करीत असताना कार्यालयातील नोकराने लपून मोबाईलने फोटो आणि व्हिडिओ काढले. ब्लॅकमेल करत शारीरिक संबंधाची मागणी केली. याप्रकरणी अजनी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. चेतन खडतकर (रा. नंदनवन) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकारनगर परिसरात राहणारी ४० वर्षीय महिला स्विटी (बदललेले नाव) हिच्या पतीचे घरीच कार्यालय आहे. कार्यालयात चेतन गेल्या पाच वर्षांपासून काम करतो. स्विटीचा कार्यालयात नेहमी वावर असल्याने चेतनशी तिची ओळख झाली. मालकाचा विश्‍वास संपादन केल्यामुळे चेतन स्विटीसोबत खरेदी, बाजार आणि अन्य कामांसाठी बाहेर जात होता. दरम्यान चेतन स्विटीवर एकतर्फी प्रेम करायला लागला.

एसीच्या छिद्रातून शूटिंग

तिला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरत होता. गेल्या ६ जुलैला सकाळी १० वाजता स्विटी आंघोळीला गेली होती. चेतनने खिडकीतून मोबाईलने फोटो आणि व्हिडिओ काढले. तसेच २४ जुलैला चेतनने बेडरूममध्ये कपडे बदलत असताना भिंतीला एसीसाठी केलेल्या छिद्रातून तिची शुटिंग केली. त्यानंतर तिच्याच कार्यालयातील संगणकावर धमकीचे पत्र टाईप केले. तिला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची मागणी केली. अश्‍लील फोटो आणि व्हिडिओ दाखवले. चेतनचा मोबाईल बघून महिलेला धक्‍का बसला. तिने फोटो डिलीट करण्याची तसेच पतीला न सांगण्याची विनंती केली.

शारीरिक सुखाची मागणी करीत अश्लील चाळे

मात्र, चेतनने त्याबदल्यात शारीरिक सुखाची मागणी करीत तिच्याशी अश्लील चाळे केले. महिलेने त्याला दूर लोटत सुटका केली. परंतु चेतनने त्याचा फायदा घेत तिच्याशी वारंवार अश्‍लील चाळे करीत तिला त्रस्त करून सोडले. शेवटी महिलेने जाचाला कंटाळून पतीला सांगितले. दोघेही पती-पत्नी अजनी पोलिस ठाण्यात गेले. चेतनविरूध्द तक्रार केली. पोलिसांनी नोकराविरूध्द गुन्हा दाखल केला.

संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT