Athletics  sakal
नागपूर

Athletics : आशियाई ज्युनिअर ॲथलेटिक्ससाठी महाराष्ट्राच्या सात खेळाडूंची निवड

दुबई येथे उद्या (ता. २४) पासून सुरू होत असलेल्या आशियाई ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी ६० खेळाडूंचा भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून त्यात महाराष्ट्राच्या सात ॲथलिट्‍सचा समावेश आहे. भारतीय संघात ३१ मुलांचा समावेश आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दुबई येथे उद्या (ता. २४) पासून सुरू होत असलेल्या आशियाई ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी ६० खेळाडूंचा भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून त्यात महाराष्ट्राच्या सात ॲथलिट्‍सचा समावेश आहे. भारतीय संघात ३१ मुलांचा समावेश आहे.

ही स्पर्धा २७ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत लिमा (पेरू) येथे होणाऱ्या जागतिक ज्युनिअर स्पर्धेसाठी पात्रता स्पर्धाही आहे. गेल्या वर्षी कोरियात झालेल्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सहा सुवर्णपदकांसह १९ पदके जिंकली होती.

भारतीय संघात महाराष्ट्राच्या गौरव भोसले (पुणे), निखिल ढाके, अनुष्का कुंभार (सातारा), प्राची देवकर (सातारा), रुजुला भोसले, साक्षी चव्हाण, सिया सावंत (मुंबई) यांचा समावेश आहे. गौरव हा माजी आंतरराष्ट्रीय धावपटू भास्कर भोसले यांचा मुलगा असून त्याची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होय. तो ३००० व ५००० मीटर शर्यतीत सहभागी होईल.

अनुष्का ही आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या बाबतीत अनुभवी असून ती ४०० मीटर हर्डल्स व ४-४०० मीटर रिले शर्यतीत सहभागी होणार आहे. तिने यापूर्वीही ज्युनिअर, युवा आशियाई व जागतिक ज्युनिअर स्पर्धेत भाग घेतला आहे. रुजूला, साक्षी व सिया या तिघी ४-१०० मीटर रिले शर्यतीत सहभागी होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : कमी दाबाचा पट्टा सक्रिय पण महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार; पुढच्या चार दिवसांचा हवामान अंदाज असा

Ashadhi Ekadashi 2026 Marathi Wishes: "अवघा रंग एक झाला..." आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा विठ्ठलभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Vidhansabha: संसदीय परंपरा आणि कायदा कसा बनतो? विद्यार्थ्यांनी समजून घेतली प्रक्रिया! मुख्यमंत्र्यांकडून भरभरून कौतुक!

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT